सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव घसरला होता. परंतु, त्यानंतर झळाळी कायम सुरु आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐनसणासुदीत सोन्याचा भाव वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीने जोरदार उसळी घेतली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सोने-चांदीने चढाईही सुरु केली. त्यानंतर ही उसळी कायम आहे. आज सोन्याचा भाव ६० हजार पार गेला आहे. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहे.
1. आजचा भाव
गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार शनिवारी आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,350 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,370 रुपयांनी वाढ झाली होती तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,450 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,470 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोनं खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार शनिवारी ७,६९० प्रतिकिलो रुपयांनी मोजावा लागला आहे. तर आज भावात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत ६०,३२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ६०,३२० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३२० रुपये (Money) इतका असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.