Gold Silver Price (31st July) : सोने खरेदीचा गोल्डन चान्स! जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दर आपटला; जाणून घ्या आजचा भाव

Today's 31st July Gold Silver Rate In Maharashtra : आज जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.
Gold Silver Price (31st July)
Gold Silver Price (31st July)Saam Tv
Published On: 

Gold Silver Rate In Maharashtra :

आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढत होत असते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीचे भाव वेगाने वाढले होते. मागच्या दोन महिन्यात धातूच्या किमती घसरल्या होत्या.

अमेरिकेतील घडामोडींवर सोने-चांदीची आगेकूच होत असते. जुलै महिन्यात सोन्या-चांदीच्या वाढत्या दराने ग्राहकांच्या नाकी नऊ आणले होते. अशातच आज जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील हे जाणून घेऊया.

Gold Silver Price (31st July)
How to Test Gold Purity At Home : तुमचं सोने खरे आहे की खोटे ? या सोप्या टिप्सवरुन कळेल

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार गुरुवारी २७ जुलैला सोन्या (Gold)-चांदीचे भाव घसरले होते तर २९ जुलैला २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात २७० रुपयांनी (Money) वाढ झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजार ३८० रुपयांवर पोहचले आहेत. अशातच आज बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार आज सोन्याचा भाव २४ कॅरेटसाठी ५९,५५० रुपये मोजावे लागणार आहे.

2. आजचा चांदीचा भाव काय?

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार चांदीचे (Silver) दर ७३,९१० रुपये प्रति किलोने सकाळच्या सत्रात विकले जात आहे. मागली ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७४,११० रुपये होते. यामध्ये २०० रुपयांनी घट झाली आहे.

Gold Silver Price (31st July)
Drinking Hot Water Morning Benefits: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे माहितेय का?

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार मुंबईमध्ये २४ कॅरेटसाठी ५९,५५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५५० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५५० रुपये आहे.

Gold Silver Price (31st July)
One Day Trip In Badlapur: निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय? बदलापूरमधली ही ठिकाणे आहेत मनमोहक!

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.