

आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आता अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर ITR भरून घ्या. अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात लोक पोर्टलवर लॉग इन करत असल्यामुळे वेबसाइटवर ताण येऊ शकतो आणि तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.
ITR भरणं ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही तर भविष्यात कर्ज, व्हिसा किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना त्याचा मोठा फायदा होतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, रिटर्न भरण्यापूर्वी आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती एकदा नीट तपासून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होते आणि उशिरा रिटर्न भरल्यामुळे लागणारा दंडही टाळता येतो.
सर्वात आधी https://www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर तुमचा PAN हा User ID म्हणून वापरून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर 'e-File' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर 'Income Tax Returns' आणि मग 'File Income Tax Return' हा पर्याय निवडा.
यानंतर Assessment Year (AY) 2026-27 निवडा. हा पर्याय आर्थिक वर्ष 2025-26 साठी रिटर्न भरण्यासाठी आहे. पुढे Online Mode निवडून 'Continue' वर क्लिक करा.
तुमच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार योग्य फॉर्म निवडावा.
ITR-1: पगारावर काम करणाऱ्या आणि साध्या उत्पन्नाचे स्रोत असलेल्या व्यक्तींसाठी.
ITR-2: भांडवली नफा (Capital Gain), परदेशातील मालमत्ता किंवा एकापेक्षा जास्त घर असलेल्या व्यक्तींसाठी.
ITR-3: व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न (Business/Professional Income) असलेल्या व्यक्तींसाठी.
ITR-4: Presumptive Taxation Scheme निवडणाऱ्या करदात्यांसाठी.
रिटर्न का भरत आहात, ते नमूद करा
तुमचं उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे.
काही विशिष्ट नियमांनुसार ITR भरणं बंधनकारक आहे.
किंवा तुमच्यासाठी लागू होणारे इतर योग्य कारण निवडा.
भरलेली माहिती नीट तपासा
पोर्टलवर तुमची अनेक वैयक्तिक आणि आर्थिक माहिती आधीपासून भरलेली दिसेल. मात्र, ती एकदा काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे.
PAN, आधार आणि बँक खात्याची माहिती
पगार आणि इतर उत्पन्नाची माहिती (Form 16 आणि Form 26AS मधून आलेली माहिती)
कलम 80C, 80D आणि इतर कलमांअंतर्गत घेतलेल्या करसवलती (Deductions)
सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करा.
तपासणीनंतर तुमच्यावर काही कर बाकी असल्याचं दिसत असेल तर तो आधी भरून टाका. त्यानंतर रिटर्नचा संपूर्ण सारांश (Summary) पुन्हा एकदा तपासा आणि सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून रिटर्न सबमिट करा.
ITR सबमिट केल्यानंतर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे. ते केल्याशिवाय तुमची रिटर्न प्रक्रिया पूर्ण होत नाही.
Aadhaar OTP
Net Banking
Electronic Verification Code (EVC)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.