Ladli Behna Yojana: लाडकीच्या खात्यात ३२वा हप्ता जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला ₹१५०० आले का?
छत्तीसगड सरकारची लाडली बहना योजना
महिलांना आज मिळणार ३२वा हप्ता
महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. छत्तीसगड सरकारनेही लाडली बहना योजना राबवली आहे. आता या योजनेचा ३२वा हप्ता जमा करण्यात आला आहे.
छत्तीसगडचे सीएम मोहन यादव यांनी डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आज दुपारी २ वाजता मोहन यादव एका कार्यक्रमातून महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातील.
लाडली बहना योजनेत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यामध्ये तु्म्ही अधिकृत वेबसाइटवर cmladlibahna.mp.gov.in जाऊन पैसे आले की नाही त्याची स्थिती चेक करु शकतात.
पैसे आले की नाही कसं चेक करायचं? (Ladli Behna Yojana Installment Recieve or Not How to Check)
सर्वात आधी तुम्हाला cmladlibahna.mp.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला अर्ज आणि पेमेंट स्टेट्सवर क्लिक करा.
यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कळणार आहे.
लाडली बहना योजना सुरु होऊन वर्ष होऊन गेले आहेत. आतापर्यंत महिलांच्या खात्यात ३१ हप्ते जमा झाले आहेत. आज ३२वा हप्ता जमा केला जाणार आहे. दरम्यान, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात योजनेचा हप्ता वाढवून देण्यात आला होता. यानंतर पुढे भविष्यात या योजनेचा हप्ता ३००० रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असंही सांगितलं आहे. २०२८ पर्यंत हप्ता ३००० रुपये करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

