Post Office Scheme: मुलीच्या भविष्यासाठी बेस्ट योजना! पोस्ट ऑफिसच्या या स्कीममधून मिळू शकतात लाखो रुपये

Government Savings : सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या नावाने दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanasaam tv
Published On: 

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची लघुबचत योजना आहे. मुलीच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकांना तिच्या नावाने खातं उघडता येतं. या योजनेचा उद्देश मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासारख्या भविष्यातल्या खर्चासाठी आर्थिक तरतूद करणं हा आहे. या योजनेत खातं उघडल्यापासून १५ वर्षांपर्यंत पैसे जमा करता येतात. मात्र, खातं उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी खातं मॅच्युअर होतं. म्हणजेच, १५ वर्षे नियमित गुंतवणूक केल्यानंतरही पुढील वर्षांमध्ये नियमानुसार व्याज मिळत राहते.

मुलीच्या नावावर खाते कोण उघडू शकते?

मुलगी १० वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने हे खाते उघडता येते. एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडण्याची परवानगी आहे. एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही खाती उघडता येतात; जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या बाबतीत नियमांनुसार अपवाद आहेत.

Sukanya Samriddhi Yojana
PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

व्याजातून ५० लाख रुपये कसे मिळू शकतात?

सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वाधिक फायदा घेण्यासाठी आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. म्हणजेच १५ वर्षांत एकूण २२.५ लाख रुपयांची गुंतवणूक होते.

Sukanya Samriddhi Yojana
Horoscope : ६ राशींचं नशीब पालटणार? १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान करिअर आणि पैशाबाबत मोठे संकेत

किमान किती पैसे जमा करता येतात?

सुकन्या समृद्धी योजनेत एका आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. खाते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते.

शिक्षणासाठी पैसे काढण्याची सुविधा

मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, यापैकी जे आधी होईल त्या वेळी, उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील शिल्लक रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत पैसे काढता येऊ शकतात. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com