Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Will Application Restart Update: लाडकी बहीण योजनेत अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार की नाही अशा प्रश्न महिलांच्या मनात आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार का?

आदिती तटकरेंनी दिली माहिती

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ६८ लाख महिलांचा लाभ बंद केला आहे. या महिला निकषात बसत नाहीये. काही महिलांनी केवायसी केलेली नाही. केवायसीचा प्रश्न असतानाच आता नवीन आर्थिक वर्षात महिलांना पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी मिळणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मार्चचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोर

लाडक्या बहि‍णींना पुन्हा अर्ज करता येणार? (Ladki Bahin Yojana Will Registration Restart)

लाडकी बहीण योजनेचे काही निकष आहेत. यामध्ये वयोमर्यादेची अट आहे. दरम्यान, जेव्हा लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरु झाली होती तेव्हा अनेक महिलांचे वय २१ पेक्षा कमी होते. त्यानंतर अनेक महिला वयोमर्यादेत बसल्या परंतु तोपर्यंत अर्ज करण्याची डेडलाइन संपली होती. त्यामुळे नव्याने वयोमर्यादेत असलेल्या महिलांना लाभ मिळत नाहीये. यामुळे आता पुन्हा नव्याने नोंदणी सुरु होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरेंचे खास ट्वीट, ईकेवायसीवर म्हणाल्या...

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

आदिती तटकरेंनी केवायसीच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली आहे. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ असा की, या योजनेत आता कोणीही अर्ज करु शकत नाही. अर्जप्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

ईकेवायसीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाहीये, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: सरकारचे १२,००० कोटी वाचणार; eKYC नंतर ६८ लाख लाडक्या बहिणी अपात्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com