Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? टेन्शन वाढवणारी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana February Month Installment: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. फेब्रुवारी महिन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिला आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत आहेत. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारीचा हप्ता येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. कदाचित फेब्रुवारी महिन्यात महिलांना १५०० रुपये मिळणार देखील नाहीत. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: वर्ध्यातील ३२०० लाडक्या बहिणी कारच्या मालकीण; जिल्ह्यातील बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार

लाडकी बहीण योजनेत महिलांना पडताळणी केली जात आहे. पाच टप्प्यांमध्ये ही पडताळणी केली जाणार आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांची सध्या तपासणी सुरु आहे. ही पडताळणी होण्यासाठी अजून आठ-दहा दिवस लागण्याची शक्यता आहे.यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. पडताळणी झाल्यानंतर १५०० रुपये दिले जातील. त्यासाठी मार्च महिना उजाडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये काही महिला आधीच इतर योजनांचा लाभ घेत आहेत. काही महिलांकडे चारचाकी वाहने आहेत. तर काही महिला २१ ते ६५ या वयोगटात बसत नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : धुळ्यात २० लाडक्या बहिणींनी नाकारला योजनेचा लाभ; १४ हजार महिलांचे अर्ज झाले रद्द

लाडकी बहीण योजनेत महिलांची पाच टप्प्यांमध्ये पडताळणी केली जाणार आहे. त्यात पहिला टप्प्यात चारचाकी वाहने असणाऱ्या महिलांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर उत्पन्न, वयोगट या गोष्टींचा पडताळणी करणार आहे. या योजनेतून अजून अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार? या दिवशी सरकार देणार खुशखबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com