Ladki Bahin Yojana: ७२ तासात लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर खटाखट जमा होणार १५०० रुपये

Ladki Bahin Yojana January Month Installment: लाडकी बहीण योजनेत लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीला मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaAI Image
Published On

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात. या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. ७२ तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'ला २१०० रुपये मिळणार का? मंत्र्यांच्या विधानानं 'लाडकी'चा जीव टांगणीला, VIDEO

लाडकी बहीण योजनेच जानेवारीचा हप्ता २६ जानेवारी रोजी जमा होणा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी ४ दिवस उरले आहेत.त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता. त्यानंतर आता जानेवारीतदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत होत्या. अपात्र लाडक्या बहि‍णींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होते. त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं जातं होतं. मात्र, याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. अपात्र असूनही त्या या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 'लाडकी'कडून 1500 वसूल करणार? लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन, VIDEO

२१०० रुपये कधीपासून?

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र, याबाबत कोणतीही शिफारस बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्रालयाकडे करण्यात आलेली नाही.त्यामुळे मार्च महिन्यात तरी २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: बजेटनंतर लाडकीला मिळणार २१०० रुपये? भाजप मंत्र्यांनी तारीखच सांगितली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com