
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत महिला २१०० रुपये मिळण्याची वाट पाहत आहेत. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात. १ फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे सध्या फेब्रुवारी महिन्यात तरी २१०० रुपये मिळणार नाही. देशाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत कोणताही निर्णय होणार नाही. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेबाबतचा निर्णय हा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात होऊ शकतो. राज्याचे अर्थसंकल्प मार्च महिन्यात होणार आहे. या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा करु शकतात.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता
लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी कोणत्याही इतर योजनेच्या लाभ घेत नसावा.महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला सरकारी विभागात कार्यरत नसावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.