Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनो, ही बातमी नक्की वाचा; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीनंतर अपात्र लाभार्थ्यांची नावं वगळ्यात आली आहेत. पुरुष लाभार्थी आणि नियमबाह्य लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून १६५ कोटी महिला पात्र ठरल्या आहेत.
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Updatemeta ai
Published On

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर आता सरकारकडून नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांसह नियमांचं उल्लंघन करून अर्ज करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण माध्यमांना दिलं आहे.

पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारकडून लाभार्थ्यांची पुनर्तपासणी करण्यात आली. यासाठी ई-केवायसी प्रोसेस राबवण्यात आली. सुरुवातीला महिलांना अर्ज करताना अडचणी येऊ नयेत म्हणून कठोर तपासणी करण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर योजनेच्या नियमांनुसार पडताळणी सुरू करण्यात आली.

Ladki Bahin Yojana Update
Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, नियमाबाहेर कोणालाही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. सतत संधी देऊनही ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या तसेच योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. तपासणीमध्ये न बसणाऱ्या लाभार्थी महिला या आयकर भरणाऱ्या कुटुंबातल्या असल्याचं आढळलं आहे. नियमानुसार अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

Ladki Bahin Yojana Update
Bank Job: या बँकेत तब्बल २४८२ पदांसाठी भरती, पगार मिळेल बक्कळ, पण फक्त यांनाच करता येणार अर्ज

पुरुष लाभार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई

पडताळणीदरम्यान काही पुरुषांनी महिलांच्या नावाने किंवा स्वत:अर्ज करून योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अशा लाभार्थ्यांवर कडक कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही नियमबाह्य पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

१ कोटी ६५ लाख महिलांना नियमित लाभ

ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर राज्यातल्या १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र ठरल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली. या पात्र महिलांना ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com