
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीत यश मिळाले तर हा हप्ता वाढवून देऊ, असं आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत हप्ता २१०० रुपये करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु हे वाढीव पैसे महिलांना कधी मिळणार, याकडे महिलांचे लक्ष आहे. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेत फक्त अटीत बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे. या योजनेत ज्या महिलांबद्दल तक्रारी येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण नसतानाही जर योजनेचा लाभ घेत असाल तर सावध व्हा. तुम्हा दंडासहित पैसे परत करावे लागतील.
महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, गरीब नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, हे यामागचे उद्दिष्ट आहे. मात्र, हेदेखील खरं आहे की या योजनेचे काही नियम आहे. या योजनेत एका घरातील दोन महिलांना पैसे देता येणार नाही. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना पैसे मिळणार नाही. गरीबांना या योजनेचा लाभ मिळावा. ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतः हून आपली नावे काढावीत. जे पैसे दिले आहेत ते परत घेता येणार नाही आणि परत मागवूदेखील नयेत. परंतु यापुढे लोकांना सांगावे की, ज्या महिला नियमात बसत नाही त्यांनी या योजनेतून नावे काढून घ्यावीत. जर असं केलं नाही तर दंडासहित पैशांची वसूली करावी, असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेचे काही निकष आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरत असणाऱ्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन घेणाऱ्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.