Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! नागपूरमधील १ लाख महिलांच्या खात्यात रुपयाही येणार नाही, सरकारचा मोठा निर्णय

Government Scheme: लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. पण नागपूरमधल्या १ लाख महिलांना आता हप्ता दिला जाणार नाही. याचं नेमकं कारण पुढील माहितीत देण्यात आलं आहे.
Government Scheme
Ladki Bahin Yojana Updategoogle
Published On

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरतेय. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ईकेवायसी प्रोसेसे सुरु होती आणि त्यात पात्र महिलांची पडताळणी केली जात होती. त्यातच आनंदाची बातमी बातमी म्हणजे १५ जूनपासून मे महिन्याचा हप्ता खात्यात सुरुवात झाली. पण आता लाडक्या बहि‍णींना धक्का बसणार आहे.

कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार? (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या १ लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. शासनाने या योजनेच्या लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ईकेवायसी पूर्ण करणं अनिवार्य केलं होतं. आता यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Government Scheme
Diabetes : डायबेटीजपासून सुटका हवीये? AIIMS तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी करा फॉलो

तपासणीदरम्यान काही महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा उत्पन्नाबद्दल खोटे दाखले देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याचसाठी शासनाने आयकर विभाग आणि आरटीओच्या डेटाबेसचा वापर करून पडताळणी केली. ज्या कुटुंबातले सदस्य आयकर भरतात किंवा ज्यांच्या नावावर चारचाकी वाहनं आहेत, अशा महिलांना योजनेच्या नियमांनुसार अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलं.

दरम्यान काही पात्र महिलांना तांत्रिक कारणांमुळे अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. अशा महिलांच्या अर्जांची फेरतपासणी केली जाणार जाईल. त्यामध्ये ज्या महिला पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र ईकेवायसी न करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या महिलांसाठी योजनेचे दरवाजे आता बंद झाल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यांना मे महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाणार नाही. तर काहींकडून वसूली होण्याचीही शक्यता आहे.

Government Scheme
Blood Pressure Tips: चहा प्यायल्यानंतर BP तपासताय? सावधान! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com