

शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला एकूण ६ हजार रुपये पाठवले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हप्ते जमा केले आहेत. आता २३ वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांना लवकरच २३ वा हप्ता दिला जाणार आहे. याची तारीख घोषित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा जो निधी पाठवला जातो. त्यातून त्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य विकत घेता येतं. शेतकऱ्यांना याच अडचणींना सामोरं जावं लागू नये म्हणून सरकार ही योजना राबवत आहे. तर आता लवकरच याचा हप्ता ज्यांनी ईकेवायसी केली असेल आणि ज्यांच्याकडे शेतकरी आयडी (Farmer ID) असेल त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे.
सरकारचा पीएम किसान योजनेता २३वा हप्ता हा २० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. याची घोषणा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी मंत्रालयातने केली आहे. तसेच पीएम किसान सन्मान योजनेचा हप्त्याची तारीख सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात आली आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे ऑफिशअल एक्स अकाउंटवरून याची घोषणा केली आहे. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये असं नमूद केलं की ,''तारीख आत्ताच नोट करा, २३ वा पीएम किसान योजनेचा हप्ता २० जून २०२६ रोजी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जाणार आहेत. '' मात्र पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अद्याप २३ वा हप्त्याबद्दल तारीख नोंदवण्यात आली नाही. तिथे २२ वा हप्त्यापर्यंतच्या नोंदी दिसत असल्यांचं शेतकऱ्यांचं मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.