

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
फक्त या महिलांनाच मिळणार जानेवारीचा हप्ता
केवायसीमधील चुकीमुळे लाखो महिलांना फटका
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी महिना उलटून गेला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न विचारत आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्तादेखील फक्त काही महिलांनाच मिळणार आहे. सर्वांनाच सरसकट १५०० रुपये मिळणार नाहीयेत. कोणाला योजनेचा लाभ मिळणार आहे ते जाणून घ्या.
फक्त या महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता (Only These Women Will Get Ladki Bahin Yojana Installment)
लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच मिळणार आहे. जर केवायसी केली नसेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. याचसोबत केवायसीमध्ये ज्या महिलांनी चुका केल्या आहेत. त्यांचाही लाभ सध्या बंद आहे.
केवायसीमध्ये चुका झाल्यानंतर ज्या महिलांचा लाभ बंद केला आहे. त्या महिलांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविका या महिला निकषात बसतात की नाही हे चेक करतात. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच महिलांचा लाभ पुन्हा सुरु होईल. दरम्यान, तोपर्यंत या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत. याआधी ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत.
केवायसीमध्ये नक्की काय चूक केली?
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत नाही ना? या प्रश्नाचे हो असं उत्तर लिहलं आहे. या प्रश्नाचं उत्तर नाही असं लिहायला हवं होतं. त्यामुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.