Ladki Bahin Yojana: एप्रिल महिना सुरु; तरी मार्चचा हप्ता मिळाला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana March Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. एप्रिल महिन्यात मार्चचे १५०० रुपये दिले जाऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी येणार?

मार्चचा हप्ता लांबणीवर

एप्रिल महिन्यात पैसे येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मार्च महिना संपला आता एप्रिलचा पहिला आठवडादेखील संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. महिलांना पैसे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहि‍णींवर २१ हजार कोटींचा खर्च; २० महिन्यापासून ₹१५०० घेतले

लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana March Installment Date)

मागच्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जात आहेत.त्यानंतर आतादेखील महिलांच्या खात्यात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु दर महिन्याला पैसे उशिरा येत असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana
ladki bahin yojana : अपात्र लाडकींकडून 21 हजार कोटींची लूट; 20 महिने सरकारचे पैसे लाटले

मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana March-April Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेत एकीकडे मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मागच्या महिन्यातदेखील फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एक येईल, असा अंदाज होता. मात्र, महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आतादेखील मार्च- एप्रिलचा हप्ता एकत्र येणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com