Ladki Bahin Yojana: उरले फक्त काही तास! अजूनही मार्च एप्रिलचा हप्ता जमा नाही, लाडक्या बहि‍णींना ₹३००० कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana March April Installment Date: एप्रिल महिना संपायला अवघे काही तास उरले आहेत. त्याआधी लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता दिला जाण्याची शक्यता होती. मात्र, महिलांसाठी अजून घोषणा करण्यात आलेली नाही.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

महिना संपायला शेवटचे काही तास तरीही खात्यात पैसे जमा नाही

एप्रिल महिना संपत आला आहे. उद्यापासून मे महिना सुरु होईल तरीही महिलांच्या खात्यात अजून मागच्याच महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. महिलांना मार्च महिन्याचेच पैसे मिळालेले नाही. महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अजूनही त्याबाबत काहीही घोषणा केलेली नाही.त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतरचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनही आलेला नाही. आजच्या दिवसात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत घोषणा होऊ शकते.

लाडकी बहीण योजनेत महिलांना या महिन्यात फक्त मार्चचा हप्ता मिळणार की मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्र येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मागच्या महिन्यातदेखील दोन हप्ते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, महिलांना एकाच महिन्याचे पैसे देण्यात आले. त्यामुळे या महिन्यातदेखील लाडक्या बहि‍णींना १५०० की ३००० रुपये मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

लाडक्या बहिणींसाठी आज शेवटची संधी (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Today)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी आहे. ज्या महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत त्या चुका सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही आज केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. तुम्हाला इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी आज संध्याकाळपर्यंत केवायसी करायची आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधीही येऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com