Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा

Ladki Bahin Yojana June-July Installment Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून आणि जुलैचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात.
Published on

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फक्त या महिलांनाच मिळणार ₹१५००, यादीत तुमचंही नाव आहे का?

लाडकींना जून-जुलैचा हप्ता एकत्र मिळणार? (Ladki Bahin Yojana June-July Installment Come Together)

लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकते. यामागचे कारण असे की महिना संपायला अवघे ६-७ दिवस उरले आहेत अजूनही याबाबत घोषणा केलेली नाही. याआधीही दोन महिन्याचे हप्ते एकाच महिन्याच देण्यात आले आहेत. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) स्वतः घोषणा करुन लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देतात. त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, जूनच्या १५०० रुपयांबाबत कोणतीही माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारची भेट, शून्य % व्याजाने कर्ज मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय|VIDEO

मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर गेला होता. हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर जून महिन्याचा हप्तादेखील जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.जर असं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जूनचा हप्ता, सोबतच मिळणार लोन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com