
लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता
जुलैचा हप्ता लांबणीवर, ऑगस्टमध्ये खात्यात येणार पैसे
जुलै महिना संपला आहे.तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांना अनेक प्रश्न पडले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैचे पैसे कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, आता हा जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यातच दिला जाणार आहे.
पुढच्या महिन्यात मिळणार जुलैचा हप्ता (When Will Ladki Bahin July Month Installment Deposit)
आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तरीही अद्याप जुलैच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा हप्ता ऑगस्टमध्येच दिला जाणार आहे.ऑगस्टमध्ये नेमके कधी पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार याबाबत माहिती समोर आलेली नसली तरीही रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात १५०० जमा होण्याची शक्यता (July Month 1500 Rupees Installment May Come On Raksha Bandhan)
९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्यामुळे रक्षाबंधनचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. जर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. ऑगस्ट महिन्यात बहिणींचा म्हणजे रक्षाबंधन सण आहे. त्यामुळे कदाचित या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जुलै अन् ऑगस्टचे ३००० रुपये एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana July and August 3000 Rupees May Come Together)
आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. त्यामुळे कदाचित रक्षाबंधनच्या दिवशी जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येऊ शकतात. महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाऊ शकतात. दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.
लाडकी बहीण योजना काय आहे?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला खात्यात किती पैसे जमा केले जातात?
लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात.
जुलैचा हप्ता कधी येणार?
लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात जमा केला जाणार आहे. कदाचित रक्षाबंधनचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.