

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्याचा सरकारकडून विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार?
सध्या लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. ऑगस्ट महिन्याचेही काही दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये एकाच वेळी खात्यात जमा करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महिला व बाल विका, विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिल्याचे वृत्त आहे. पण १५ ऑगस्टलाच पैसे जमा होतील, याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, काही अहवालांमध्ये नमूद केल्यानुसार २० ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणं यासह इतर पात्रता निकष लागू आहेत. ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेतल्या लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी e-KYC प्रोसेस सुरू करण्यात आसी आहे. अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू नये आणि सरकारी निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.