DA Hike 2026 : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात पुन्हा 3% वाढ होणार? DA बद्दल मोठी अपडेट समोर

Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२६ पासून ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. वाढ झाल्याने डीए ६३ टक्क्यांवर पोहोचेल आणि पेन्शनर्सनाही लाभ मिळू शकतो.
Central Government Employees
Central Government Employeesmeta ai
Published On

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचारी आठवे वेतन लागू होण्याची वाट पाहत आहेत. त्याचसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महागाई भत्त्यामध्ये (DA) परत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै ते डिसेंबर २०२६ या महिन्यांसाठी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३ टक्क्यांची वाढ जाहीर करू शकते. ही वाढ झाल्यावर ६० टक्क्यांचा महागाई भत्ता ६३ टक्क्यांवर पोहोचेल.

१ जुलैपासून वाढीचा लाभ

महागाई भत्त्यामध्ये होणारी संभाव्य वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होईल. पण सरकारकडून अजून या वाढीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या ३ टक्के वाढीचा अंदाज म्हणूनच याकडे पाहणं महत्त्वाचं आहे.

DA वाढीचा निर्णय प्रामुख्याने महागाईच्या आकडेवारीवरून ठरवला जातो. सध्याची महागाई पाहता जुलै-ते डिसेंबर या महिन्यांसाठी ३ टक्के वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Central Government Employees
Independence Day wishes : बलसागर भारत होवो…! स्वातंत्र्यदिनी द्या हटके शुभेच्छा; व्हॉट्सॲपवरही ठेवता येतील मराठी, हिंदी, इंग्रजीतले शुभेच्छा संदेश

DA ६३ टक्क्यांवर जाण्याची शक्यता

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६० टक्के DA मिळतोय. एप्रिल २०२६ मध्ये सरकारने २ टक्के वाढ जाहीर केली होती. त्यामुळे DA ५८ टक्क्यांवरून वाढून ६० टक्के झाला होता. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली होती.

आता आणखी ३ टक्के वाढ झाल्यावर DA हा ६३ टक्क्यांवर जाईल. याचा फायदा देशातल्या १.२ कोटींपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

Central Government Employees
Ladki Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपणार! लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसांत पैसे जमा होणार? पण 1500 की 3000 रुपये?

पेन्शनधारकांना काय फायदा होणार?

DA वाढीसोबतच केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई सवलतीमध्ये (DR) सुद्धा ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना मिळणाऱ्या दरमहिन्याच्या रकमेत वाढ होऊ शकते.

घोषणा कधी होऊ शकते?

महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा साधारणपणे वर्षातून दोनदा केली जाते. जुलै ते डिसेंबर या महिन्यांमधल्या वाढीची घोषणा अनेकदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केली जाते. २०२६ मध्ये दिवाळी ८ नोव्हेंबरला असल्यामुळे त्याच्या आसपास DA वाढीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच DA वाढीचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com