

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा Farmer ID आणि संबंधित नोंदी अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. काही राज्यांमध्ये सरकारी खत दुकानातून खत खरेदी करण्यासाठी Farmer ID असणं अनिवार्य करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने याआधीच सांगितलं आहे की, वैध Farmer ID असलेल्या आणि जमिनीची नोंद उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनाच सरकारी व्यवस्थेतून खत मिळेल. खताचा गैरवापर थांबवणं आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचवणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
Farmer ID कशी तयार कराल?
शेतकऱ्यांना Farmer ID तयार करण्यासाठी राज्याच्या AgriStack Farmer Registry पोर्टलचा वापर करता येतो. यासाठी नवीन यूजर अकाउंट तयार करून ई केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागते. आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर आलेला ओटीपी यासाठी गरजेचा असतो.
यानंतर वैयक्तिक माहिती भरून जमिनीचा सर्व्हे नंबर किंवा प्लॉटची माहिती जोडावी लागते. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर डिजिटल Farmer ID आणि प्रमाणपत्र डाउनलोड करता येते.
२४ वा हप्ता कधी जमा होणार?
पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. उपलब्ध माहितीनुसार, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२६ मध्ये हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम तारीख केंद्र सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच ठरेल.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६००० मिळतात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २००० प्रमाणे दिली जाते.
हप्त्याचे स्टेटस कसे तपासाल?
शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाइल नंबरच्या माध्यमातून माहिती मिळवता येते. ओटीपी आणि कॅप्चा भरल्यानंतर हप्त्याची स्थिती, पेमेंटची माहिती आणि काही त्रुटी असेल तर त्याची माहिती स्क्रीनवर दिसते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.