Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख सांगितली, मार्च महिन्याचं काय? आदिती तटकरेंनी विषय संपवला

Ladki Bahin Yojana March Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबाबत माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनी मिळणार आहे.फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्चला येणार आहे.दरम्यान, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख समोर आली आहे. त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ५० लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होणार; सरकारचे किती पैसे वाचणार?

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्याचा हप्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत होऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात कधीही मार्च महिन्याचा हप्ता येऊ शकतो, असं आदिती तटकरेंनी सांगितलं. अर्थसंकल्पानंतर मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत घोषणा होऊ शकते. असंही आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात २ हप्ते मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. महायुती सरकारने नेहमी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सक्षमरित्या सुरु ठेवणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता आल्यानंतर मग मार्च महिन्याचा हप्ता दिला जाणार असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये? १० दिवसांत होणार मोठा निर्णय

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार? (When Will 2100 Rupees Get)

लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्च महिन्यात २१०० रुपयांबाबत मोठी घोषणा होऊ शकते. अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये मिळणार की नाही हे कळणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर केला जाणार आहे. त्यानंतर महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हा हप्ता १५०० रुपयांचा असणार की २१०० रुपये याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात येणार २१०० रुपये; अर्थसंकल्पापूर्वी मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com