

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
ईकेवायसीसाठी मुदत वाढणार का?
ईकेवायसी न केल्यास लाभ बंद होणार
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांनी केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी केल्यानंतरच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची मुदत संपली आहे. लाखो महिलांनी केवायसी केलेले नाही. त्यांचा लाभ बंद झाला आहे. त्याचसोबत ज्या महिलांनी केवायसीत चुका केल्या आहेत त्यांचाही लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीची शेवटची संधी (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत त्या सुधारण्याची शेवटची संधी महिलांना मिळाली आहे. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे. त्यामुळे महिलांनी त्याआधी हे काम करायचे आहे. अनेक महिलांना केवायसी करताना प्रश्न नीट समजला नव्हता. त्यामुळे प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली होती. आता या महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या महिलांनी केवायसी करायचे आहे. जर महिलांनी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.
लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended or not)
लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्त करण्यासाठी शेवटचे ७ दिवस उरले आहेत. दरम्यान, या कालावधीत केवायसी करायची आहे. कवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. दरम्यान, केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सरकारने आधीच केवायसीसाठी अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे यानंतर मुदत वाढण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.