Silai Machine Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! शिलाई मशीनसाठी मिळणार आर्थिक मदत; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Free Sewing Machine Scheme 2026: महिलांना शिलाई मशीन किंवा आर्थिक मदतीची माहिती समोर आली आहे. पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रोसेस जाणून घ्या.
Silai Machine Yojana
Silai Machine Yojanameta ai
Published On: 

Government Scheme: घरबसल्या स्वत:चा व्यवसाय सुरू करून उत्पन्न मिळवण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी शिलाई व्यवसाय हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. महिलांना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर ‘मोफत शिलाई मशीन योजना २०२६’ या नावाने पात्र लाडक्या बहि‍णींना शिलाई मशीन किंवा त्यासाठी आर्थिक मदत मिळत असल्याची माहिती दिली जातेय. मात्र, योजनेची पात्रता आणि अर्ज प्रक्रिया संबंधित अधिकृत यंत्रणेकडून तपासणे महत्त्वाचे आहे.

योजनेचा उद्देश काय?

आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरीब आणि श्रमिक महिलांना स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करता यावा, हा अशा योजनांचा मुख्य उद्देश आहे. शिलाई मशीनच्या मदतीने महिला घरातून कपडे शिवणे, कपड्यांची दुरुस्ती किंवा ऑर्डरनुसार शिलाईची कामे उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करू शकतात.

महिलांना काय फायदा होऊ शकतो?

पात्र महिलांना शिलाई मशीन किंवा आर्थिक मदत मिळते. तसेच घरबसल्या शिलाई व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. महिलांना स्वत:चे उत्पन्न निर्माण करण्यास मदत होऊ शकते. ग्रामीण तसेच शहरी भागातल्या गरजू महिलांना याचा लाभ मिळू शकतो. विधवा आणि दिव्यांग महिलांना काही योजनांमध्ये विशेष प्राधान्य दिलं जाऊ शकतं.

पात्रता काय?

दिलेल्या माहितीनुसार अर्जदार महिलेचे वय २० ते ४० वर्षे असावे. पतीचे वार्षिक उत्पन्न १२ हजार ते १.२० लाखांपर्यंत असण्याची अट काही ठिकाणी नमूद केली जाते. मात्र, ही पात्रता योजना, राज्य किंवा संबंधित विभागाच्या नियमांनुसार बदलू शकते.

कोणती कागदपत्रे लागतील?

अर्जासाठी आधार कार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असू शकतो. लागू असल्यास दिव्यांगत्व किंवा विधवा प्रमाणपत्रही मागितली जाऊ शकते.

अर्ज कसा करायचा?

संबंधित अधिकृत सरकारी पोर्टल किंवा कार्यालयावर योजनेची उपलब्धता तपासा. अर्ज उपलब्ध असेल तर तो भरून आवश्यक कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर अर्ज संबंधित कार्यालयात किंवा नमूद केंद्रावर जमा करावा. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार शिलाई मशीन किंवा आर्थिक मदत मिळू शकते.

महत्त्वाचे - ‘मोफत शिलाई मशीन योजना २०२६’ या नावाने सोशल मीडियावर किंवा विविध वेबसाइटवर फिरणारी माहिती पाहताना सावधगिरी बाळगा. अर्ज करण्यापूर्वी संबंधित केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेचे नाव, पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया निश्चितपणे तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com