Kotak Mahindra Bank : ग्राहकांसाठी कोटक महिंद्रा बँकेकडून 'संकल्प बचत खाते' लॉन्च, Zero Balance मध्ये खाते उघडता येणार

Zero Balance Account : वार्षिक जवळपास २४ लाख रूपये काढण्‍याची मुभा आणि प्रतितिमाही २५०० रूपयांची किमान शिल्‍लक राखण्‍याची सुविधा.
Kotak Mahindra Bank
Kotak Mahindra Banksaam Tv

Saving Account : ग्रामीण व अर्ध-शहरी ग्राहकांच्‍या रोख-आधारित बँकिंग गरजांची पूर्तता करण्‍यासाठी कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ('केएमबीएल'/'कोटक') ने संकल्‍प बचत खात्‍याच्‍या लाँचची घोषणा केली.

संकल्‍प बचत खाते अनेक सेवा देते, जसे रोख डिपॉझिटवर zero Balance, वार्षिक जवळपास २४ लाख रूपये काढण्‍याची मुभा आणि प्रतितिमाही २५०० रूपयांची किमान शिल्‍लक राखण्‍याची सुविधा. तसेच संकल्‍प या बाजारपेठांमधील ग्राहकांना सोने, दुचाकी व ट्रॅक्‍टरवर विशेष दरांमध्‍ये कर्ज देखील देते.

Kotak Mahindra Bank
Gold Silver Rate (30th August) : रक्षाबंधनाला सोन्याचे दर ६० हजार पार, चांदीही वधारली; दागिने खरेदीसाठी किती खर्च करावा लागेल

संकल्‍प बचत खाते उदयोन्‍मुख ग्राहक समूहाला कृषीमधून, तसेच कृषीपलीकडील उत्‍पन्‍न प्राप्‍त करून देण्‍याच्‍या दृष्टीकोनासह लाँच करण्‍यात आले आहे. बँकिंग (Bank) सेवा देण्‍याव्‍यतिरिक्‍त नवीन बचत खाते ग्रामीण व अर्ध-शहरी ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक बँकिंग गरजांसाठी कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी टॉक टाइम व पेशॉपमोअर डेबिट कार्ड (Debit Card) देखील देते.

Kotak Mahindra Bank
Indian Railway News : घाबरु नका! प्रवास करताना रेल्वेचे तिकीट फाटले किंवा हरवले? लगेच करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड

कोटक महिंद्रा बँकेच्‍या वितरण, रिटेल दायित्‍वाचे अध्‍यक्ष व प्रमुख पुनीत कपूर म्‍हणाले, ''इंटरेनटचा वाढता वापर आणि नॉन-मेट्रो शहरांमधील उत्‍पन्‍नाच्‍या मार्गांमधील बदल यासह ग्राहक वैविध्‍यपूर्ण बँकिंग सेवांचा शोध घेत आहेत, जे रोख-आधारित असण्‍यासोबत अधिक पैसे काढण्‍याची मर्यादा व सुलभ कर्ज अशा त्‍यांच्‍या बँकिंग गरजांची पूर्तता करतील. संकल्‍प बचत खाते सोईस्‍कर बँकिंग सुविधा देण्‍यासह आकर्षक मूल्‍यवर्धित सेवा देते, जे विशेषत: या ग्राहक समूहासाठी क्‍यूरेट करण्‍यात आले आहेत.''

संकल्‍प बचत खात्‍याची वैशिष्‍ट्ये:

1.सरासरी मासिक शिल्‍लक २५०० रूपये असलेल्‍या किंवा किमान ३६५ दिवसांसाठी २५,००० मुदत ठेव असलेल्‍या ग्राहकांसाठी २५० रूपयांचा एक-वेळ फायदा.

2.गोल्‍ड लोन आणि दुचाकी व ट्रक्‍टर कर्जावरील (Loan) प्रक्रिया शुल्‍कामध्‍ये अनुक्रमे १०० टक्‍के व ५० टक्‍के सूट.

3.पेशॉपमोअर डेबिट कार्डसह स्‍थानिक एटीएममध्‍ये दररोज ४०,००० रूपये काढण्‍याची मर्यादा आणि दररोज २ लाख रूपयांपर्यंत खरेदी करण्‍याची मर्यादा

4.जवळपास ५ लाख रूपयांपर्यंत कॉम्प्‍लीमेण्‍टरी वैयक्तिक अपघातीय मृत्‍यू संरक्षणासाठी पेशॉपमोअर डेबिट कार्ड; लॉस्‍ट कार्ड लायबिलिटी; जवळपास २,५०,००० रूपयांपर्यंत आणि डायनिंग, शॉपिंग व प्रवासाददरम्‍यान दररोज स्‍पेशल ऑफर्स.

Kotak Mahindra Bank
Problem Of Stomach Burning : जेवल्यानंतर पोटात जळजळ होते? असू शकतो गंभीर आजार

संकल्‍प बचत खाते, 'एक विश्‍वास आगे बढते रहने का' कोटक महिंद्रा बँकचा भारतातील ग्रामीण व अर्ध-शहरी ग्राहकांना सोईस्‍कर, उपलब्‍ध होण्‍याजोगे व किफायतशीर बँकिंग सोल्‍यूशन प्रदान करण्‍याप्रती प्रयत्‍न आहे. संकल्‍प बचत खाते जलदपणे व सोईस्‍करपणे उघडता येते, कोटकची वेबसाइट किंवा मोबाइल अॅपच्‍या माध्‍यमातून किंवा बँकेच्‍या कोणत्‍याही शाखांना भेट देत डिजिटली अर्ज करण्‍याचा पर्याय आहे. यामधून सर्व ग्राहकांना सुलभ उपलब्‍धतेची खात्री मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com