Problem Of Stomach Burning : जेवल्यानंतर पोटात जळजळ होते? असू शकतो गंभीर आजार

Acidity Problem : जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे हे अॅसिडीटीचे लक्षण समजले जाते.
Problem Of Stomach Burning
Problem Of Stomach Burning Saam tv
Published On

Acidity Home Remedies : चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आपल्याला अपचन किंवा गँसेसच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हल्ली या समस्या प्रत्येक वयोगटतील वर्गाला भेडसावत आहे. जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे हे अॅसिडीटीचे लक्षण समजले जाते. ज्याला डॉक्टरांच्या मते छातीत जळजळ आणि अॅसिड रिफ्लक्स म्हणतात.

काहीही खाल्ल्यानंतर जळजळ होण्याची समस्या अधिकतर तिखट अन्न किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उद्भवते. छातीत जळजळ होणे ही समस्या सामान्य जरी असली तरी ते आजाराचे लक्षण असू शकते. असे का होते हे जाणून घेऊया

Problem Of Stomach Burning
Detox Drink: असे बनवा डिटॉक्स वॉटर, सुटलेलं पोट आठवड्याभरात झरकन कमी होईल

1. जेवल्यानंतर पोटात का जळते?

जेवल्यानंतर पोटात (Stomach) जळजळ होण्याच्या समस्येला अनेक कारणे जबाबदार असू शकतात. जे लोक भरपूर मसालेदार पदार्थ खातात त्यांना या समस्येचा सर्वाधिक धोका असतो.

2. गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD)

ऍसिड रिफ्लक्समुळे छातीत जळजळ होऊ शकते. जेव्हा आपण अन्नपदार्थ (Food) खातो तेव्हा पोटाच्या खालच्या भागात पोहोचते आणि अन्ननलिकेमध्ये पुन्हा वर येऊ लागते, तेव्हा या समस्येला गॅस्ट्रोएसोफेजल ऍसिड रिफ्लक्स (GERD) म्हणतात.

Problem Of Stomach Burning
White Hair Problem: अकाली पिकणाऱ्या केसांमुळे त्रस्त? मेहंदी लावल्याने कोरडे होतात? स्वयंपाकघरातील हे पदार्थ, केस होतील काळेभोर-घनदाट

3. Hiatal हर्निया

आपल्या ओटीपोटीत हर्निया नावाची सामान्य स्थिती असते. ज्यामुळे अन्नपदार्थ खाण्यात अडचण निर्माण होते, चिडचिड, वेदना, थकवा किंवा तोंडाची चव खराब होते. यासाठी आपण आहारातील अन्नपदार्थ बदलून पाहावे.

4. मसालेदार अन्न

आपल्यालापैकी अनेकांना तिखट व झणझणीत पदार्थ खाण्याची सवय असते. ज्यामुळे तोंडात आणि घशात जळजळ होते. मसालेदार अन्नपदार्थ खाल्ल्याने तोंड येणे, पोट दुखणे, पोटात आग पडणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Problem Of Stomach Burning
Smartphone Radiation: मोबाईलचं रेडिएशन कसं चेक कराल? शरीरावर होतात घातक परिणाम

5. पोटात जळजळ होण्याची समस्या या प्रकारे दूर करा

1. पोटात जळजळ होण्याची समस्या तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत असेल तर डॉक्टरांचा (Doctor) सल्ला अवश्य घ्या. काही घरगुती उपाय देखील करुन पाहा.

2. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने ऍसिड रिफ्लक्स होते ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात.

3. जेवल्यानंतर किमान 1000 पावले चाला. असे केल्याने पचनक्रिया, रक्तातील साखरेची पातळी आणि आरोग्य चांगले राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com