Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Jio Hotstar Budget Plans: जिओ हॉटस्टारवरील आवडते शो आणि चित्रपट पाहण्यासाठी आता महाग सबस्क्रिप्शनची गरज नाही. फक्त १०० रुपयांत मिळवा OTT प्रवेशासह हाय स्पीड डेटा प्लॅन.
JIO OTT PLANS: 90 DAYS ENTERTAINMENT AND DATA FOR JUST ₹100 – 3 CHEAPEST OPTIONS
जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे १०० रुपयांखाली उपलब्ध ओटीटी प्लॅन्स – हॉटस्टार ऍक्सेस आणि डेटा फायदे
Published On
Summary
  • जिओ, एअरटेल आणि Vi च्या ओटीटी प्लॅन्स १०० रुपयांपासून सुरू होतात.

  • एअरटेल प्लॅन ५ जीबी डेटा आणि ३० दिवसांचा हॉटस्टार ऍक्सेस देतो.

  • जिओ प्लॅनमध्ये ९० दिवसांचा हॉटस्टार ऍक्सेस मिळतो.

  • Vi प्लॅन १५० रुपयांचा असून ४ जीबी डेटा आणि ९० दिवसांचा हॉटस्टार ऍक्सेस देतो.

आजच्या डिजिटल युगात प्रेक्षकांना घरी बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसीरिज पाहणे अधिक आवडते. जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट पाहण्यासाठी अनेक जण सबस्क्रिप्शन घेतात. मात्र, प्लॅनच्या किंमती जास्त असल्याने अनेक यूजर्स मागे हटतात. याच पार्श्वभूमीवर टेलिकॉम कंपन्यांनी केवळ १०० रुपयांपासून सुरू होणारे असे काही खास रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामध्ये डेटा आणि ओटीटी दोन्हीचा फायदा मिळतो.

एअरटेलचा १०० रुपयांचा प्रीपेड प्लॅन यूजर्सना जिओ हॉटस्टारचा ऍक्सेस आणि ५ जीबी हाय स्पीड डेटा देतो. हा प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे, मात्र यात कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत नाही कारण तो फक्त डेटा प्लॅन आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओचा १०० रुपयांचा प्लॅनही ५ जीबी डेटा देतो, पण त्याची खासियत म्हणजे फक्त १०० रुपयांत ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा फायदा. यामुळे यूजर्स मोबाईल, टीव्ही किंवा इतर डिव्हाइसवर तीन महिन्यांसाठी हॉटस्टार पाहू शकतात.

JIO OTT PLANS: 90 DAYS ENTERTAINMENT AND DATA FOR JUST ₹100 – 3 CHEAPEST OPTIONS
Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

व्होडाफोन आयडियाने (Vi) याच श्रेणीतील प्लॅन १५० रुपयांत उपलब्ध करून दिला आहे. हा प्लॅन एअरटेल आणि जिओपेक्षा महाग असला तरी यूजर्सना ९० दिवसांची वैधता मिळते. यामध्ये ४ जीबी डेटासोबत ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टार ऍक्सेस मिळतो.

JIO OTT PLANS: 90 DAYS ENTERTAINMENT AND DATA FOR JUST ₹100 – 3 CHEAPEST OPTIONS
Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?

तथापि, लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे या प्लॅन्सचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांच्या नंबरवर आधीपासून प्रायमरी प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे. कारण हे सर्व ओटीटी प्लॅन फक्त डेटा आणि सबस्क्रिप्शनसाठी आहेत, ज्यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचा समावेश नाही.

Q

१०० रुपयांचा एअरटेल प्लॅन काय फायदे देतो?

A

एअरटेलचा १०० रुपयांचा प्रीपेड प्लॅन ५ जीबी हाय स्पीड डेटा आणि ३० दिवसांसाठी जिओ हॉटस्टार ऍक्सेस देतो, पण कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळत नाही.

Q

जिओ १०० रुपयांचा प्लॅन कसा वेगळा आहे?

A

जिओच्या प्लॅनमध्ये ५ जीबी डेटा देण्यात येतो, तसेच फक्त १०० रुपयांत ९० दिवसांसाठी हॉटस्टार ऍक्सेस मिळतो.

Q

व्होडाफोन आयडियाचा (Vi) प्लॅन कसा आहे?

A

Vi चा प्लॅन १५० रुपयांचा असून यात ४ जीबी डेटा आणि ९० दिवसांसाठी हॉटस्टार ऍक्सेस मिळतो.

Q

या प्लॅन्ससाठी कोणती अट आहे?

A

या प्लॅन्सचा फायदा घेण्यासाठी तुमच्या नंबरवर आधीपासून प्रायमरी प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com