Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?

Recharge Plans: आज आम्ही तुम्हाला Jio आणि VI या टेलिकॉम कंपन्यांच्या सर्वात किफायतशीर रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये ग्राहकांना दररोज तब्बल २.५ जीबी इंटरनेट डेटा मिळतो.
Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?
Published On
Summary
  • जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन वीआयच्या ४६९ रुपयांच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे.

  • दोन्ही प्लॅनमध्ये २.५जीबी डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारखेच आहेत.

  • जिओमध्ये अतिरिक्त अॅप्स आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शनचा लाभ मिळतो.

  • वीआयमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड डेटासारखे विशेष फायदे आहेत.

रिचार्ज प्लॅन निवडताना कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. ग्राहकांची हीच गरज ओळखून रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या दोन्ही टेलिकॉम कंपन्या आकर्षक योजना सादर करत आहेत. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेली व्होडाफोन-आयडिया यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. अलीकडेच VI-JIOने आपली 5G सेवा सुरू केल्यानंतर ग्राहकांसाठी पर्याय अधिक वाढले आहेत.

जिओचा दररोज २.५ जीबी डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन ३९९ रुपयांचा असून त्यात २८ दिवस वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाऊड तसेच ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा लाभ मिळतो.

Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?
Realme 15T 5G Launched: 7000mAh बॅटरीसह कमी किमतीत दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

दुसरीकडे, व्होडाफोन-आयडियाचा समान सुविधा देणारा प्लॅन ४६९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्येही २८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस यांसह वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट आणि १२ तासांसाठी अनलिमिटेड डेटाचा अतिरिक्त लाभ दिला जातो. याशिवाय, या प्लॅनमध्येही ९० दिवसांचा जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शनचा समावेश आहे.

Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?
Whatsapp Tricks: Whatsapp च्या १० ट्रिक्स; कोणालाच माहित नाही, करतील अनेक कामे सोपी

किंमतीनुसार पाहिल्यास जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन अधिक स्वस्त असल्याने बजेट लक्षात घेणाऱ्या ग्राहकांसाठी तो उत्तम पर्याय ठरतो. मात्र, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड डेटा वापरणाऱ्यांसाठी व्होडाफोन-आयडियाचा प्लॅन आकर्षक ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या वापराच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडणे गरजेचे आहे.

Jio vs Vi Recharge Plan: जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन अधिक फायदेशीर?
Samsung Galaxy S25 FE: सॅमसंगचा मेगा लाँचिंग शो, आयफोन १७ आधी नवीन प्रीमियम स्मार्टफोन होणार लाँच, जाणून घ्या दमदार फिचर्स
Q

जिओचा २.५जीबी डेटा प्लॅन किती रुपयांचा आहे?

A

जिओचा सर्वात स्वस्त २.५जीबी डेली डेटा प्लॅन ३९९ रुपयांचा आहे.

Q

वीआयचा २.५जीबी डेटा प्लॅन किती रुपयांचा आहे?

A

वीआयचा समान सुविधा देणारा प्लॅन ४६९ रुपयांचा आहे.

Q

जिओच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात?

A

अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाऊड आणि ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा लाभ मिळतो.

Q

वीआयच्या प्लॅनमध्ये काय विशेष आहे?

A

वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाईट, १२ तास अनलिमिटेड फ्री डेटा आणि ९० दिवसांसाठी हॉटस्टार सबस्क्रिप्शन दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com