सॅमसंगने गॅलेक्सी एस२५ एफई ५जी अधिकृतपणे लाँच केला आहे.
यात ६.७ इंच AMOLED डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा आणि एआय फीचर्स आहेत.
४९००एमएएच बॅटरी ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
भारतातील किंमत आणि विक्री तारीख अद्याप घोषित झालेली नाही.
सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये नवीन पिढीचा फॅन एडिशन स्मार्टफोन गॅलेक्सी एस२५ एफई ५जी अधिकृतपणे सादर केला आहे. हा स्मार्टफोन गॅलेक्सी एस२५ मालिकेतील काही प्रमुख वैशिष्ट्यांसह येतो, परंतु तुलनेने परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वनयूआय ८ अपडेट्स, प्रगत गॅलेक्सी एआय फिचर्स आणि सुधारित आकर्षक डिझाइनमुळे हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्तराचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी परिपूर्ण ठरणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले असून, तो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टरसह 1900nits पर्यंत पीक ब्राइटनेस प्रदान करतो. डिझाइनच्या बाबतीत त्याला अॅल्युमिनियम फ्रेम आणि मॅट-ग्लास फिनिश मिळाली आहे. हा फोन केवळ 0.6mm स्लिम असून त्याचे वजन 190 ग्रॅम आहे.
कॅमेरा विभागात सॅमसंगने आपली खासियत कायम ठेवली आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा ३x ऑप्टिकल झूमसह टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहे. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो आधीच्या एस२४ एफईच्या १० मेगापिक्सेल कॅमेऱ्यापेक्षा अपग्रेड आहे.
स्मार्टफोनला ४९०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट करते. हा डिव्हाइस तीन रंगांमध्ये उपलब्ध होईल – नेव्ही, जेट ब्लॅक आणि व्हाइट. याशिवाय, ग्राहकांना 8GB+128GB, 8GB+256GB आणि 8GB+512GB असे तीन स्टोरेज पर्याय मिळतील.
यामध्ये एक आकर्षक ऑफरदेखील आहे. गॅलेक्सी एस२५ एफईच्या खरेदीसोबत ग्राहकांना सहा महिन्यांचा Google AI Pro ट्रायल मोफत मिळेल, ज्यामध्ये Gemini, Flow, NotebookLM आणि इतर प्रीमियम टूल्सचा अनुभव घेता येईल. भारतामध्ये या स्मार्टफोनची किंमत आणि विक्रीची तारीख सॅमसंग लवकरच जाहीर करणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफई ५जी मध्ये कोणता डिस्प्ले आहे?
या फोनमध्ये 6.7-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 1900nits ब्राइटनेस आहे.
गॅलेक्सी एस२५ एफई ५जी मध्ये कॅमेरा सेटअप कसा आहे?
यात ५० एमपी मुख्य कॅमेरा, १२ एमपी अल्ट्रावाइड, ८ एमपी टेलिफोटो लेन्स आणि १२ एमपी सेल्फी कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता किती आहे?
गॅलेक्सी एस२५ एफई मध्ये ४९००एमएएच बॅटरी असून ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
भारतातील किंमत आणि विक्री तारीख जाहीर झाली आहे का?
नाही, भारतातील किंमत आणि विक्री तारीख सॅमसंग लवकरच जाहीर करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.