ITR Filling 2026: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत काय? वाचा सविस्तर

ITR Filling 2026 Deadline: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय असा प्रश्न करदात्यांना पडल आहे. दरम्यान, वेगवेगळ्या आयटीआर फॉर्म्ससाठी डेडलाइन वेगवेगळी असते.
ITR Filling
ITR Filling 2026Saam Tv
Published On
Summary

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय?

वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाचा

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता आयटीआर फाइल करण्याची सुरुवात लवकरच होईल. दरम्यान, जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आर्थिक वर्ष २०२-२०२६ साठी आयटीआर फाइल करण्याची तारीख वेगळी आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वेगवेगळी असणार आहे.

ITR Filling
ITR दाखल करण्याची झंझट संपली; कर भरण्याचे नियम बदलणार; नवीन काय आहे अपडेट जाणून घ्या

अर्थसंकल्पात केली होती घोषणा

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळीच आयटीआर फाइल करण्यासाठीच्या वेगवेगळ्या डेडलाइनची घोषणा रेली.

निर्मला सितारामन यांनी सांगितले की, आयटीआर १ आणि आयटीआर २ फाइल करण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. ज्या प्रकरणांमध्ये ऑडिट होत नाही त्यांच्यासाठी ही मुदत ३१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

सॅलरी, पेन्शन आणि गुंतवणूकदारांसाठी माहिती

जर तुम्हाला पगार, पेन्शन येत असेल. एक घर किंवा मालमत्तेवर व्याज मिळत असेल. तुमचा कोणताही बिझनेस नसावा. या करदात्यांना आयटीआर १ किंवा आयटीआर २ फॉर्म भरायचा आहे. या करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ आहे.

फ्रिलान्सर, लहान व्यावसायिकांसाठी संधी

जर तुमचा लहान बिझनेस असेल आणि तुमच्या अकाउंटस्साठी ऑडिटची गरज नसेल तर तुम्ही आयटीआर ३ किंवा आयटीआर ४ फाइल करु शकतात. यासाठी डेडलाइन ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

ITR Filling
ITR दाखल करण्याची झंझट संपली; कर भरण्याचे नियम बदलणार; नवीन काय आहे अपडेट जाणून घ्या

टॅक्स ऑडिट करणाऱ्यांसाठी डेडलाइन

ज्या बिझनेसमध्ये ऑडिट गरजेचे आहे त्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी अजून मुदत देण्यात आली आहे. यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत आहे.

डेडलाइनपूर्वी आयटीआर फाइल न केल्यास काय होणार (What if ITR do Not File Before Deadlune)

वेगवेगळ्या फॉर्मसाठी डेडलाइन वेगवेगळी आहे. तुम्ही ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. त्यांना दंड आणि त्यावर व्याजदेखील द्यावे लागते.त्यामुळे करदात्यांनी डेडलाइनपूर्वी आयटीआर फाइल करायचा आहे.

ITR Filling
ITR Filling 2026: आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक; आताच तयार ठेवा, अन्यथा येईल अडचण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com