

आयटीआर कधीपासून फाइल करता येणार?
आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
कागदपत्रे नसल्यास आयटीआर फाइल करताना येऊ शकते अडचण
ITR Filling: नवीन आर्थिक वर्ष सुरु होताच आयटीआर कधीपासून फाइल करता येणार असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. लवकरच आयटीआर फॉर्म जारी केले जाणार आहे.आयटीआर फाइल करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. तुम्ही आयटीआर फइल करत असताना जर ही कागदपत्रे नसतील तर तुम्हाला अनेक अडचणी येतील. यामुळे तुम्ही डिडक्शन विसरु शकता. यामुळे रिफंड जमा होण्यास उशिर होऊ शकतो. त्यामुळे आयटीआर फाइल करण्यापूर्वी तुमच्याकडे ही कागदपत्रे असायलाच हवी.
आधार-पॅन कार्ड (Aadhaar-PAN Card)
आयटीआर फाइल करताना सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार आणि पॅन कार्ड. पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. याचसोबत मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता अपडेट असायला हवा. याद्वारे तुमच्या फोनवर ओटीपी येईल. त्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल.
फॉर्म 16 (Form 16)
जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला फॉर्म 16 दिला जातो. यामध्ये तुमची सॅलरी, टॅक्स कपात याबाबत सर्व माहिती असते. हे कागदपत्र खूप महत्त्वाचे आहे.
फॉर्म 26AS
तुम्हाला फॉर्म 26AS आणि अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटदेखील डाउनलोड करायचे आहे.यामध्ये टीडीएस, बँकेच्या व्याजाचे स्टेटमेंट, शेअर आणि म्युच्युअल फंडबाबत माहिती दिलेली असते.
सॅलरी स्लिप (Salary Slip)
तुम्ही सॅलरी स्लिपदेखील सांभाळून ठेवायची आहे. यामध्ये तुमच्या एचआरए, पीएफ आणि कपातीबद्दल माहिती असते. याचसोबत बँक स्टेटमेंट, एफडी इंटरेस्ट सर्टिफिकेटदेखील आवश्यक आहे.
गुंतवणूकीचे पुरावे
जर तुम्हाला जुन्या कर प्रणालीअंतर्गत सूट हवी असेल तर तुम्हाला गुंतवणूकीचे पुरावे जपून ठेवायचे आहे. यामध्ये LIC, PPF, ELSS, ट्यूशन फीस, हेल्थ इन्श्युरन्स आणि होम लोनचे कागदपत्र असतील. यामधील माहितीवरुन तुम्ही क्लेम करु शकता.
HRA क्लेम (HRA Claim)
जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ते कर्मचारी एचआरए क्लेम करु शकतात. यासाठी त्यांच्याकडे भाड्याची रिसिप्ट आणि भाडेकरार असायला हवा. याचसोबत जर शेअर, संपत्ती किंवा सोनं विकलं असेल तर त्यासंबंधित कागदपत्रेदेखील असायला हवीत.
घरभाड्यातून येणारे उत्पन्न
जर तुमचे घर भाड्याने दिले असेल तर त्याबाबतही माहिती तुम्हाला द्यायची आहे. पेन्शन, डिविडेंड यातून होणाऱ्या उत्पन्नाचीदेखील नोंद ठेवायची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.