ITR Filling: आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे २० दिवस! हे काम लगेच करा अन्यथा भरावा लागेल दंड

ITR Filling Last Date: आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. अजूनपर्यंत ज्यांनी आयटीआर फाइल केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे, असं सांगण्यात आलं आहे.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

प्रत्येक करदात्यांना आयटीआर फाइल करणे गरजेचे आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख अवघ्या १५- २० दिवसांवर आहे.तुम्ही १५ सप्टेंबर २०२५ पर्यंतच आयटीआर फाइल करु शकतात. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत आयटीआर फाइल केला नाही त्यांनी लवकरात लवकर करा. जर तुम्ही आयटीआर फाइल करण्यास उशिर केला तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

ITR Filling
ITR Filling : आयटीआर फाइल करण्याआधी कोणती कागदपत्रे हवीत? संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

दरम्यान, २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत फक्त ३.६८ कोटी आयटीआर रिटर्न फाइल केले आहेत. हे आयटीआर मागच्या वर्षीच्या तुलनेत अर्धेदेखील नाही आहेत. यातील ३.५४ कोटी आयटीआर वेरिफाय झाले आहेत. २.३० कोटी आयटीआर प्रोसेसमध्ये आहेत. त्यामुळे अजूनही अनेक लोकांचे आयटीआर फाइल करणे बाकी असल्याचे समोर आले आहे.

मुदतीआधी करा आयटीआर फाइल अन्यथा येईल अडचण

एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, ज्या लोकांनी आयटीआर फाइल केले नाही त्यांनी लवकर करावे. अन्यथा त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागेल. दरम्यान, जेव्हा अचानक अनेक लोक एकत्र आयटीआर फाइल करतील तेव्हा त्यांना सर्व्हर डाउनची अडचण येऊ शकते.

ITR Filling
ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

उशिरा आयटीआर भरल्यास दंड

तुम्ही जर मुदतीआधी आयटीआर फाइल करता आला नाही तर तुम्हाला बिलेटेड आयटीआर फाइल करावा लागणार आहे. हा बिलेटेड आयटीआर फाइल करताना तुम्हाला टॅक्सवर १ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. याचसोबत दंडदेखील भरावा लागणार आहे. तुम्हाला १००० ते ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

पहिल्यांदाच मुदत वाढवली

आयटीआर फाइल करण्याची मुदत ३१ जुलै होती. यंदा पहिल्यांदाच आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. यंदा टॅक्स स्लॅबमधील बदल आणि आयटीआर फॉर्म येण्यास उशिर झाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

ITR Filling
ITR Filing : आयकर रिटर्न भरताना तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या अन् दंड टाळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com