

प्राप्तिकर परतावा विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ३१ जुलैपर्यंत आयटीआर फाइल करता येणार आहे. सरकारन इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत आणखी वाढवेल, अशी अपेक्षा कोट्यवधी करदात्यांची आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची मुदत वाढवून दिली जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Income Tax News)
करदात्यांनी (Taxpayers) लवकरात लवकर आयटीआर फाइल करावे, असे आवाहन महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी केले आहे. अर्थ मंत्रालयाकडून आयटीआर फाइल (ITR Filing) करण्याची मुदत वाढवली जाणार नाही. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ५.८३ कोटी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यात आली होती.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आयटीआर फाइल होण्याची अपेक्षा आहे, असे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले. आयटीआर फाइल करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासूनच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे करदात्यांचे आभार व्यक्त करतो. करदात्यांनी आयटीआर फाइल करण्यासाठी अखेरच्या दिवसाची प्रतीक्षा करू नये, असे आवाहनही मल्होत्रा यांनी केले.
करदात्यांनी लवकरात लवकर आयटीआर दाखल करावा असा सल्ला मी देऊ इच्छितो, असे महसूल सचिवांनी सांगितले. ३१ जुलै जवळ येत आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.