iPhone 17 Pro Max : 24MP फ्रंट कॅमेरा अन् जबरदस्त फीचरसह iPhone 17 होणार लवकरच लाँच; तारीख आली समोर

iPhone 17 Features : फोटो प्रेमींसाठी खुशखबर! पुढील वर्षात आयफोन 17 च्या सीरीजमध्ये मोठे बदल होणार आहे. 24- मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह आयफोन लॉन्च होणार आहे.
iPhone 17 Features
iPhone 17 Pro MaxSAAM TV
Published On

अ‍ॅपल पुढील वर्षात आयफोन 17, आयफोन 17 स्लिम, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स असे चार आयफोन 17 मॉडेल्सचे व्हिडिओ कॉल आणि सेल्फी सेवा अपग्रेड करणार आहे. 24-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह आयफोन लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

मॅकरुमर्सच्या मते, इन्व्हेस्टमेंट बँक हाईटोंगच्या एका रिसर्च नोटमध्ये, जेफ पु यांनी खुलासा केला आहे की, आयफोन 17 सीरीजमध्ये सहा लेन्स एलिमेंटसह 24-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. तर आयफोन 15 च्या सीरीजमध्ये पाच लेन्स एलिमेंटसह 12-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. तसेच मिंग-ची कुओ यांनी असा दावा केला आहे की, जानेवारीमध्ये किमान एक आयफोन 17 मॉडेल 24-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि सहा-पीस लेन्ससह लॉन्च करण्यासाठी सुसज्ज असेल. यामुळे मोबाईलचा दर्जा वाढेल.

iPhone 17 Features
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांची मोठी घोषणा, लवकरच समुहाचे अध्यक्षपद सोडणार; कोट्यवधींचा कारभार कोण सांभाळणार?

24-मेगापिक्सेल कॅमेरा तुम्हाला अजून चांगली फोटोची गुणवत्ता देणार आहे. तुम्ही फोटो छान क्रॉप करून शकता. सहा लेन्स एलिमेंट फोटोतील कमी दूर करून फोटो स्पष्ट आणि सुंदर करेल. यामुळे तुम्हाला अचूक लांबचे दृश्य टिपता येईल. अ‍ॅपल आयफोन 17 मॉडेल सीरीज सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

आयफोन 17 वैशिष्ट्ये

  • आयफोन 17 स्लिममध्ये 6.6-इंच स्क्रीन असेल.

  • आयफोन 17 स्लिममध्ये टायटॅनियम-ॲल्युमिनियम मिश्र धातुची फ्रेम असेल.

  • कंपनीच्या सुपर-स्लिम आयफोनमध्ये फक्त एक मुख्य वाइड कॅमेरा असणार आहे. म्हणजे त्यात अल्ट्रावाइड आणि टेलिफोटो लेन्स नसतील.

iPhone 17 Features
WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी!आता 'या' स्मार्टफोनमध्ये होणार WhatsApp बंद; तुमचा फोन आहे का यात?लगेच चेक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com