Motorola ने भारतात लाँच केला 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाण्यात पडला तरी काम करेल छान
Motorola Edge 50

Motorola ने भारतात लाँच केला 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाण्यात पडला तरी काम करेल छान

Motorola Edge 50 भारतात लॉन्च झालाय. कंपनीने या मालिकेतील Edge 50 अल्ट्रा, Edge 50 प्रो आणि Edge 50 फ्यूजन भारतात आधीच लॉन्च केलेत.
Published on

Motorola Edge 50 ला भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या सीरिजमध्ये Edge 50 Ultra, Edge 50 Pro आणि Edge 50 Fusion हे स्मार्टफोन आधीच बाजारात आणलेत. या सीरिजमधील सर्वात स्टॅण्डर्ड मॉडेल असलेल्या Sony Lytia 700 प्रायमरी कॅमेरा , IP68 रेटिंग सारख्या उत्कृष्ट फीचर्स येत असतात. चला, जाणून घेऊया Motorola च्या या दमदार स्मार्टफोनबद्दल

Motorola Edge 50 ची किमती किती

Motorola Edge 50 हे सिंगल स्टोरेज व्हेरिएंट 8GB RAM + 256GB मध्ये लाँच केले गेले आहे. मोटोरोलाच्या या फोनची किंमत 27,999 रुपये आहे. फोनची पहिली विक्री 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरू केली जाईल. फोनच्या पहिल्या सेलमध्ये यूजर्सला 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळू शकतो. हा मोटोरोला फोन जंगल ग्रीन, पँटोन पीच फज आणि कोआला ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

जबरदस्त फीचर्स

Edge 50 मध्ये कंपनीने 1.5K रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा poOLED वक्र डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz उच्च रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 1,900 nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आणि HDR10+ साठी पाठिंबा देतो. या फोनमध्ये कंपनीने MIL-810H मिलिटरी ग्रेड अतिशय पातळ बॉडी वापरली गेलीय. कंपनीने फोनच्या डिस्प्लेमध्ये स्मार्ट वॉटर टच तंत्रज्ञानाचा वापर केलाय. त्यामुळे फोन पाण्यात पडला तर किंवा पावसात ओला झाला तरी हो फोन चांगल्या पद्धतीने काम करेल.

या Motorola फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 AE प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असेल. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 68W USB टाइप C टर्बो चार्जिंग फीचर उपलब्ध असेल. हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E, NFC, GPS सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

Motorola Edge 50 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. यात 10MP टेलिफोटो आणि 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा प्रदान करण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आलाय.

Motorola ने भारतात लाँच केला 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाण्यात पडला तरी काम करेल छान
Realme 13 Pro, Realme 13 Pro+ भारतात लाँच; Realmeच्या स्मार्टफोनमध्ये आहेत आश्चर्यकारक फीचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com