Realme 13 Pro, Realme 13 Pro+ भारतात लाँच; Realmeच्या स्मार्टफोनमध्ये आहेत आश्चर्यकारक फीचर्स

Realme ने अजून एका स्मार्टफोनची सीरिज भारताच्या मार्केटमध्ये लाँच केलाय. चायना ब्रँड असलेल्या या नव्या सीरिजने Realme 12 Proच्या अपग्रेड वर्जनचे स्मार्टफोन आता बाजारात आणलेत. लाँच झालेल्या या मालिकेतील दोन्ही फोन सारखेच दिसत आहेत आणि त्यांचे अनेक फीचर्सही सारखेच आहेत.
Realme 13 Pro, Realme 13 Pro+ भारतात लाँच;  Realme च्या स्मार्टफोनमध्ये आहेत आश्चर्यकारक फीचर्स
Realme 13 Pro, Realme 13 Pro+
Published On

भारतीय बाजारात Realme ने Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ 5G लाँच केलेत. Realme ची ही मध्यमवर्गातील लोकांसाठी बजेटवाल्या लाँच झालेल्या लाँच झालेल्या Realme 12 Pro मालिकेची जागा घेईल. Realme च्या सीरिजमध्ये AI फीचर्स देण्यात आली आहेत. या सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये 5,200mAh बॅटरी आणि पॉवरफुल कॅमेरा यात देणअयात आलाय.

या सीरिजच्या दोन्ही फोनमधील रिअर कॅमेऱ्याचं डिझाइन गोलाकार करण्यात आले आहे. या स्मार्टफोन सीरिजसोबत कंपनीने Realme Watch S2 आणि Realme Buds T310 देखील भारतीय बाजारात लाँच केलेत. Realme च्या या स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्स जाणून घेऊ..

किंमत किती आहे?

Realme 13 Pro तीन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. यात 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB असे फोन लाँच करण्यात आली आहेत. या फोनच्या किमती अनुक्रमे 23,999 रुपये आहे. तर, त्याचे इतर दोन प्रकार अनुक्रमे 25,999 रुपये आणि 28,999 रुपये आहेत.

Realme 13 Pro+ मध्येही तीन स्टोरेज ऑप्शन देण्यात आलेत. 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB लाँच करण्यात आलेत. या स्मार्टफोनची किमती 29,999 रुपये आहे. तर त्याच्या इतर दोन प्रकारांच्या किमती अनुक्रमे 31,999 रुपये आणि 33,999 रुपये आहे. दरम्यान या सीरिजमधील दोन फोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केली जाईल. फोनच्या खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंतचं बँक डिस्काउंट मिळणार आहे.

Realme 13 Pro सीरीजचे फीचर्स

Realme 13 Pro च्या सीरिजचे दोन्ही फोनची स्क्रीन 6.7 इंचाची आहेत. या स्मार्टफोनचा डिस्प्ले AMOLED आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz उच्च रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतात. तसेच या दोन्ही फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे. यात 12GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट करते. Realme 13 Pro+ मध्ये 5,200mAh बॅटरी आहे. हे फोन 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

तसेच Realme 13 Pro मध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचर देण्यात आले आहे. Realme 13 Pro+ मध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आलाय. यातील 50MP मुख्य Sony LYT-701 कॅमेरा देण्यात आले आहे. जे OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर्सला सपोर्ट करते. Realme 13 Pro च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50MP मुख्य OIS कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आलंय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP कॅमेरा देण्यात आलाय.

Realme 13 Pro, Realme 13 Pro+ भारतात लाँच;  Realme च्या स्मार्टफोनमध्ये आहेत आश्चर्यकारक फीचर्स
Vivo Y18i: 5000mAh बॅटरी अन् जबरदस्त कॅमेरासह Vivo Y18i लाँच; किंमत फक्त ७९९९ रुपये;जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com