iPhone 14 वर मिळत आहे जबरदस्त सूट, अगदी कमी किंमतीत 128GB मॉडेल खरेदी करण्याची संधी

Flipkart iPhone 14 Offer: आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपलचा लोकप्रिय 5G iPhone पुन्हा एकदा मोठ्या सवलतीसह उपलब्ध झाला आहे. iPhone 15 आल्यानंतर कंपनीने iPhone 14 ची किंमत सुमारे 10 हजार रुपयांनी कमी केली होती.
iPhone 14
iPhone 14Saam Tv
Published On

Flipkart iPhone 14 Offer:

आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपलचा लोकप्रिय 5G iPhone पुन्हा एकदा मोठ्या सवलतीसह उपलब्ध झाला आहे. iPhone 15 आल्यानंतर कंपनीने iPhone 14 ची किंमत सुमारे 10 हजार रुपयांनी कमी केली होती. पण आता एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म याला कमी किमतीत विकत आहे ज्यामुळे आता हा फोन अनेकांच्या बजेटमध्ये आला आहे.

लॉन्चच्या वेळी iPhone 14 च्या 128GB मॉडेलची प्रारंभिक किंमत 79,900 रुपये होती. पण iPhone 15 लॉन्च झाल्यानंतर Apple ने iPhone 14 ची किंमत कमी केली. सवलतीनंतर iPhone 14 128GB व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये झाली आणि Apple च्या अधिकृत वेबसाइटवर ती अजूनही त्याच किंमतीवर उपलब्ध आहे. परंतु ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 14 हजार रुपयांपर्यंत स्वस्त उपलब्ध आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

iPhone 14
Crash Test : महिंद्राची स्कॉर्पिओ-एन क्रॅश टेस्टमध्ये फेल, मिळाली 0 स्टार रेटिंग

काय आहे ऑफर?

iPhone 14 128GB ब्लू कलर मॉडेल Flipkart वर फक्त 58,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड EMI हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 3000 पर्यंत सूट मिळवू शकते. फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफरनंतर iPhone 14 128GB ब्लू कलर व्हेरिएंटची किंमत 55,999 रुपयांपर्यंत खाली येईल, याचा अर्थ तुम्ही फोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा 13,901 रुपये कमी किंमतीत घेऊ शकता. फोनचे इतर सर्व रंग प्रकार फ्लिपकार्टवर 59,999 रुपयांच्या किंमतीसह लिस्टेड आहेत. (Latest Marathi News)

iPhone 14 5G स्पेसिफिकेशन

iPhone 14 अगदी iPhone 13 सारखा दिसतो आहे. नवीन iPhone 14 मॉडेल 5G ला सपोर्ट करतो आणि यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोन A15 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. सेल्फी कॅमेरा आणि फेस आयडी ठेवण्यासाठी नॉच आयफोन 14 मध्ये कायम ठेवण्यात आला आहे.

iPhone 14
Vivo ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीने आपल्या 5 Smartphones च्या किंमतीत केली मोठी कपात

iPhone 14 मध्ये मागील बाजूस ड्युअल 12-मेगापिक्सेल कॅमेरे (वाईल्ड + अल्ट्रा- वाईल्ड) समाविष्ट आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर विशेष फीचर्समध्ये वायरलेस चार्जिंग, iOS 17 आणि AirDrop यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com