Crash Test : महिंद्राची स्कॉर्पिओ-एन क्रॅश टेस्टमध्ये फेल, मिळाली 0 स्टार रेटिंग

Mahindra Scorpio N ANCAP Crash Test: ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने (ANCAP) अलीकडेच सुरक्षा फीचर्ससह 6 स्तरांवर नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-N ची टेस्ट केली आहे. ज्यात ही कार फेल झाली आहे.
Mahindra Scorpio N ANCAP Crash Test
Mahindra Scorpio N ANCAP Crash TestSaam Tv
Published On

Mahindra Scorpio N ANCAP Crash Test:

ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने (ANCAP) अलीकडेच सुरक्षा फीचर्ससह 6 स्तरांवर नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-N ची टेस्ट केली आहे. ज्यात ही कार फेल झाली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिंद्रा स्कॉर्पिओ-N ला ANCAP क्रॅश टेस्टमध्ये 0 स्टार रेटिंग मिळाले आहे.

आधी ग्लोबल NCAP मध्ये या कारला 5 स्टार रेटिंग मिळाली होती. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने यावर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपली नवीन कार Scorpio N SUV लॉन्च केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahindra Scorpio N ANCAP Crash Test
Vivo ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीने आपल्या 5 Smartphones च्या किंमतीत केली मोठी कपात

ANCAP च्या सेफ्टी टेस्टमध्ये असे आढळून आले की, नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-N चे सेफ्टी फीचर्सच्या दृष्टिकोनातून कमकुवत आहे. या वाहनात ADAS फिटमेंट नाही, जे कोणत्याही वाहनात सर्वात महत्वाचे आहे. तसेच, मध्यभागी एकही एअरबॅग नाही, ज्यामुळे कारमध्ये बसलेल्या लोक अपघात झाल्यास एकमेकांवर आदळण्यापासून वाचू शकतात. (Latest Marathi News)

विशेषत: या कारच्या समोरच्या सीटवर बसलेल्या दोन व्यक्तींसाठी साइड चेस्ट प्रोटेक्टिंग आणि हेड प्रोटेटिंगसाठी एअरबॅग्जची सुविधा उपलब्ध आहे, मात्र तिसऱ्या रांगेतील सीटवर बसणाऱ्या लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

Mahindra Scorpio N ANCAP Crash Test
Range Rover Electric चा टीझर लॉन्च, 2024 मध्ये करता येईल खरेदी? पाहा VIDEO

महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये ही कमतरता आली समोर

या कारमध्ये ऑटोमॅटिक आपत्कालीन ब्रेकिंग आणि लेन सपोर्ट सिस्टमचा अभाव आहे. फक्त समोरच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीसाठी सीटबेल्ट घालण्याचे रिमाइंडर फीचर आहे. ही कार लहान मुलांसाठी योग्य नसल्याचे ANCAP ने आपल्या सेफ्टी टेस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

ANCAP ने USV च्या सर्व प्रकारांना वेगवेगळी रेटिंग दिली आहे. जर आपण प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल बोललो तर, महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ने 40 पैकी 17.67 गुण मिळवले आहेत. चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ-एनला 49 पैकी 39.27 गुण मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com