Vivo ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कंपनीने आपल्या 5 Smartphones च्या किंमतीत केली मोठी कपात

Vivo Y Series Smartphones: चिनी स्मार्टफोन कंपनीने काही Y-सीरीज स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने Vivo Y16, Vivo Y02t, Vivo Y02, Vivo Y27 आणि Vivo 17s स्मार्टफोन्सची किंमत 1000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.
Vivo Y Series Smartphones
Vivo Y Series SmartphonesSaam Tv
Published On

Vivo Y Series Smartphones :

प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनीने Vivo ने काही दिवसांपूर्वी भारतात Vivo T2 5G आणि Vivo Y56 5G च्या किमती कमी केल्या होत्या. यानंतर Vivo T2 5G ची किंमत 2,000 रुपयांनी, तर Y56 5G ची किंमत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

यानंतर चिनी स्मार्टफोन कंपनीने काही Y-सीरीज स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने Vivo Y16, Vivo Y02t, Vivo Y02, Vivo Y27 आणि Vivo 17s स्मार्टफोन्सची किंमत 1000 रुपयांपर्यंत कमी केली आहे. कंपनीने ट्विटद्वारे Y सीरीज स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vivo Y Series Smartphones
Who is Lalit Khaitan: वयाच्या 80 व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत झाले सामील, जाणून घ्या कोण आहेत ललित खेतान?

Vivo Y17s ची किंमत 1,000 रुपयांनी झाली कमी

कंपनीने Vivo Y17s ची किंमत देखील 1,000 रुपयांनी कमी केली आहे. Y17s 4GB RAM मॉडेल 64GB अंतर्गत स्टोरेजसह आता 10,499 रुपये, तर 128GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत आता 11,499 रुपये झाली आहे. या व्हॅरिएंटची किंमत आधी अनुक्रमे 11,499 रुपये आणि 12,499 रुपये होती. (Latest Marathi News)

Vivo ने एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात दिसत आहे की, ग्राहक Vivo Y27 आणि Vivo Y17s स्मार्टफोनच्या खरेदीवर 1,000 कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच ग्राहक Vivo Y16, Y02t आणि Y02 च्या खरेदीवर नो कॉस्ट EMI ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

Vivo Y Series Smartphones
Apple MacBook वर मिळत आहे 27000 ची सूट, काय आहे Flipkart ची ऑफर? जाणून घ्या

Vivo Y16, Vivo Y02t, Vivo Y02 फोन भारतात 500 रुपयांनी स्वस्त झाले

Vivo Y16 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे, तर 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. यापूर्वी, या व्हॅरिएंटची किंमत अनुक्रमे 10,499 रुपये आणि 11,999 रुपये होती. Vivo Y02T बद्दल बोलायचे झाले तर हा आता 8,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. डिव्हाइसची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, कारण ते आधी 8,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होते.

Vivo ने Vivo Y02 ची किंमत देखील 500 रुपयांनी कमी केली आहे. हा स्मार्टफोन आता 7,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, जो आधी 8,499 रुपयांना उपलब्ध होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com