Apple MacBook वर मिळत आहे 27000 ची सूट, काय आहे Flipkart ची ऑफर? जाणून घ्या

Flipkart Sale: फ्लिपकार्टने लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये, Apple चा लॅपटॉप 27 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
Flipkart Big Year End Sale
Flipkart Big Year End SaleSaam Tv
Published On

Flipkart Big Year End Sale:

फ्लिपकार्टने लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. 16 डिसेंबरपासून सुरू असलेल्या फ्लिपकार्ट बिग इयर एंड सेलमध्ये, Appleचा एक पॉवरफुल लॅपटॉप कोणत्याही एक्सचेंज किंवा बँक ऑफरशिवाय 27 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. आम्ही Apple MacBook Air M1 बद्दल बोलत आहोत.

Apple ने हा लॅपटॉप 2020 मध्ये लॉन्च केला होता. भारतात याची किंमत 99,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये मोठ्या सूटसह उपलब्ध हा लॅपटॉप उपलब्ध आहे. नेमकी काय आहे ऑफर? याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Flipkart Big Year End Sale
Royal Enfield Shotgun 650: बाजारात धिंगाणा! आली नवीन रॉयल एनफील्ड शॉटगन 650; जाणून घ्या किंमत

Apple MacBook Air M1

Apple MacBook Air M1 लॅपटॉप 9 ते 16 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या 'बिग इयर एंड' सेल दरम्यान फ्लिपकार्टवर 26 टक्के सवलतीत उपलब्ध आहे. Apple च्या अधिकृत वेबसाइटवर या लॅपटॉपची किंमत 99,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलमधून फक्त 72,990 रुपयांमध्ये म्हणजेच सुमारे 27,000 रुपये कमी किंमतीत खरेदी करता येईल. (Latest Marathi News)

बँकेच्या ऑफर्सचा फायदा घेऊन लॅपटॉप आणखी कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो. तुम्ही तुमचे जुने डिव्‍हाइस एक्स्चेंज करून 20,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकता. Apple MacBook Air M1 लॅपटॉप 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो.

Flipkart Big Year End Sale
आता WhatsApp Chat ला सुद्धा पिन करता येणार, इतर नवीन भन्नाट Features ही होणार लॉन्च

Apple MacBook Air M1 स्पेसिफिकेशन

Apple MacBook Air M1 मध्ये 13.3-इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 2560x1600 पिक्सेल आहे. डिस्प्ले पॅनलमध्ये 400 nits ब्राइटनेस आणि 227 PPI पिक्सेल आहे. MacBook Air M1 Apple च्या M1 चिपसेटसह सुसज्ज आहे. हा लॅपटॉप 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो.

याच्या इतर फीचर्समध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, एक 720p HD वेबकॅम, दोन USB टाइप-सी पोर्ट, एक स्टिरिओ स्पीकर, तसेच ब्लूटूथ v5.0 आणि Wi-Fi 802.11x साठी सपोर्ट समाविष्ट आहे. M1 Air हे macOS Big Sur OS सह लॉन्च करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com