Shrikant Pantawane: आधी रिक्षा चालवायचा आता थेट विमान उडवतोय;नागपूरच्या श्रीकांतच्या गगनभरारीची कहाणी वाचा

Shrikant Pantawane Inspirational Story: मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एखादा व्यक्ती यशाला गवसणी घालू शकतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे पायलट श्रीकांत पंतवणे.
Shrikant Pantawane
Shrikant PantawaneSaam Tv
Published On

Motivational Story: चंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एखादा व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. यशाची पायरी म्हणजे मेहनत, असं म्हटलं जातं. कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर मात करुन यशाचं शिखर पार करणारा व्यक्ती आयुष्यात खूप मोठा होतो. नागपूरच्या श्रीकांत पंतवणेदेखील अशीच यशाला गवसणी घातली आहे. श्रीकांत पंतवणे हा एक रिक्षाचालक होता. तो आता पायलट आहे. (Shrikat Pantwane)

Shrikant Pantawane
Success Story : दिवसा समोसे विकायचा, रात्री अभ्यास; NEET Exam पास झालेल्या सनीचा संघर्ष वाचा

रिक्षाचालक ते पायलट प्रवास (Rickshaw Driver To Pilot Journey)

श्रीकांतचा रिक्षाचालक त पायलट प्रवास सोपा नव्हता. त्याच्या यशासाठी इंडिगो कंपनीने इन हाउस मॅग्जीन छापली होती. श्रीकांतचा जन्म नागपूरमध्ये झाला. श्रीकांतचे सर्व शिक्षण नागपूरमध्येच झाले. त्याचे वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप गरीबी होती. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी श्रीकांतने खूप कमी वयातच काम केले. श्रीकांत शालेय शिक्षय घेत असतानाच त्याने डिलिव्हरी बॉय आणि रिक्षा चालवण्याचे काम केले.

श्रीकांतच्या करिअरचा टर्निंग पॉइंट

श्रीकांत एकदा डिलिव्हरी करण्यासाठी एअरपोर्टवर गेला होता. तिथे एका चहावाल्यासोबत त्याचे बोलणे झाले. तेव्हा त्याला एविएशन रेग्युलेटर डीजीसीए म्हणजेच डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिविल एविएशन पायलट स्कॉलरशिप प्रोग्रामबाबत माहिती मिळाली. हा त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.

मिडिया रिपोर्टनुसार, श्रीकांतने पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी मध्य प्रदेशमधील स्कूलमध्ये प्रवेश घेतला. एविएशन स्कूलमध्ये त्याने प्रत्येक परीक्षेत टॉप केले.

Shrikant Pantawane
Zudio Success Story: रतन टाटांच्या सावत्र भावाने सांगितलं Zudio च्या यशाचं सीक्रेट

श्रीकांतने पायलट बनवण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु त्यानंतरही त्याला पायलट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली. मार्केटमध्ये मंदी असल्याने कर्मर्शियल पायलट लायसन्स देण्यास उशीर होत होता. त्या काळात त्याला कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हची नोकरी करावी लागली.

कितीही वाट पाहावी लागली तरीही तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळते असं म्हणतात. तसंच काहीसं श्रीकांतसोबत घडलं. श्रीकांतइंडिगो या एअरलाइनमध्ये सहायक पायलट म्हणून जॉइन झाला. (Success Story Of Shrikant Pantwane)

Shrikant Pantawane
Nikki Tamboli Success Story: बाईsss....! आई ₹ ५० द्यायची, तेव्हा द्यायची ऑडिशन; बिग बॉसच्या निक्की तांबोळीचा संघर्ष एकदा वाचाच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com