Success Story : दिवसा समोसे विकायचा, रात्री अभ्यास; NEET Exam पास झालेल्या सनीचा संघर्ष वाचा

Noida Samosa Seller cracks neet 2024 : नोएडामध्ये एका समोसा विक्रेत्याने नीट परीक्षेत ६६४ गुण मिळवले आहेत. सध्या या तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
नीट परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
Noida Samosa Seller cracks neet Saam Tv
Published On

मुंबई : नोएडामधल्या एका समोसा विकणाऱ्या तरूणानं नीट परीक्षा पास केल्याचं समोर आलंय. त्याने नुसतेच परीक्षा पास केली नाही तर ६६४ गुण देखील मिळवले आहेत. सनीचं नोएडामध्ये समोश्याचं दुकान आहे. एकीकडे तेलात समोसे तळताना सनीनं दुसरीकडे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. समोसे विकत त्याने अभ्यास सुरू ठेवला. कठीण परीश्रम करत त्याने नीट परीक्षेमध्ये ६६४ गुणांना गवसणी घातल्याचं समोर आलंय. फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे यांनी सनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याचं यश समोर आणलंय.

नोएडातील १८ वर्षीय समोसा विक्रेत्या सनी कुमारने अनेकांना अशक्य वाटणारी गोष्ट साध्य ( Student Success Story) केलीय. आपलं समोश्याचं दुकान चालवताना त्याने दररोज NEET UG 2024 परीक्षेत ७२० पैकी प्रभावी ६६४ गुण मिळवले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सनीच्या व्हिडिओमुळे देशभरातील अनेकांना प्रेरणा मिळतेय.

समोसा बॉयचा प्रवास

सनीचा NEET UG परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास सामान्यांपेक्षा खूपच कठीण अन् वेगळा आहे. तो त्याच्या समोश्याच्या दुकानासोबकच त्याचा अभ्यास देखील सांभाळतो. तो दररोज संध्याकाळी चार ते पाच तास समोश्याचं दुकान चालवतो. लहान औषधांनी मोठे आजार कसं बरे होऊ शकतात? हा प्रश्न त्याला सतत पडायचा. यामधूनच औषधात त्याची आवड निर्माण झाल्याचं ( Noida Samosa Seller cracks neet 2024) सनी सांगतो. या कुतूहलामुळेच सनीने जीवशास्त्र निवडले आणि नीटची तयारी सुरू केल्याचं त्यानी सांगितलं, अशी माहिती इंडिया टुडेच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

नीट परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
Success Story : २७ एकरात चंदनाची शेती, वर्षाला कोट्यवधींची उलाढाल, नगरच्या शेतकऱ्याची कमाल!

नीट उत्तीर्ण झाला

सनीने फिजिक्सवालाच्या अभ्यासक्रमाद्वारे नीटची तयारी केलीय. सोशल मीडियावर स्टोरी शेअर करताना सनीने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश कसं मिळवलं, हे सांगण्यात (neet 2024) आलंय. व्हिडिओमध्ये सनी कुमारची खोली दाखवण्यात आलीय. या व्हिडिओ फुटेजमध्ये सनीच्या खोलीच्या भिंतींवर पोस्ट केलेल्या स्टडी नोट्स स्पष्टपणे दिसत आहेत.

सनीने सांगितलं की त्याचं चहाचं दुकान वारंवार उद्ध्वस्त केलं जायचं. त्यामुळे त्याला इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरजवळ समोसा स्टॉल सुरू करावा लागला. शिक्षण सुरू (Noida Samosa Seller) ठेवण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रत्येक आव्हानाचा सामना केल्याचं सनी सांगतो. सनीचं यश हे सगळ्यांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. परिस्थितीची पर्वा न करता अडथळ्यांचा सामना कसा करायचा हे सनीकडून शिकायला मिळतंय.

नीट परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
Nikki Tamboli Success Story: बाईsss....! आई ₹ ५० द्यायची, तेव्हा द्यायची ऑडिशन; बिग बॉसच्या निक्की तांबोळीचा संघर्ष एकदा वाचाच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com