Indian Railway : रेल्वे प्रवाशांकरीता आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून या सुविधा होणार सुरू, वाचा सविस्तर

IRCTC Rules : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. या संदर्भात, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन नियम लागू करत असतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खुपच महत्त्वाची ठरेल.
Indian Railway
Indian Railway Saam Digital

Indian Railway Rules :

दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. या संदर्भात, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन नियम लागू करत असतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास (Travel) करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खुपच महत्त्वाची ठरेल. खरे तर उद्यापासून नवा महिना सुरू होत आहे.

यासोबतच 1 एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्षाचे नवी सुरवात होणार असून रेल्वे प्रवाशांसाठी काही नवीन सुविधाही देण्यात येणार आहेत. वास्तविक, नवीन बदल पेमेंटशी संबंधित आहे. 1 एप्रिलपासून, रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाइन (Online) पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी QR कोड स्कॅनिंगची सुविधा सुरू करणार आहेत.

तिकीट काउंटरवर ऑनलाइन पेमेंट करता येते

आता रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करताना QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय असेल. गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI ॲप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करू शकतील.

Indian Railway
Indian Railway : रेल्वे प्रवास सुरू असतानाही मिळणार तुमच्या आवडत्या हॉटेल्समधील गरमागरम जेवण , कसं ते जाणून घ्या?

पार्किंग आणि फूड काउंटरवर पेमेंट केले जाऊ शकते

तिकीट काउंटरसोबतच पार्किंग आणि फूड काउंटरवर प्रवाशांसाठी क्यूआर कोडचीही व्यवस्था असेल. क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाइन पेमेंट करू शकतील. मात्र, अनेक स्थानकांवर ही सुविधा आधीच उपलब्ध आहे.

Indian Railway
Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! तिकीट कन्फर्म नाही... काळजी नको १ तासात तिकीटाचे पैसे होतील रिफंड

दंडाची रक्कम ऑनलाइन जमा करणे सोपे होणार आहे

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन आता दंडाची रक्कम त्वरित ऑनलाइन जमा करता येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनल मशीनची सुविधा असेल. या डिव्हाईसमधील क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाइन दंड भरण्यास सक्षम असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com