
रेल्व प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या नवीन नियमावलीनुसार जर तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि ते तिकीट कन्फर्म झाले नाही तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचे पैसे परत मिळणार आहेत, तेही एका तासात. आयआरसीटीसी रिफंड सेवा फास्ट करण्यासाठी सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने मोठा निर्णय घेतला आहे.
तुम्ही जेव्हा IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपवरून रेल्वे तिकीट बुकींग करता तेव्हा अनेकवेळा तिकीटतर बुकींग होत नाही. पण तिकिटाचे पैसे मात्र कापले जातात. त्यानंतर रिफंडचे पैसे परत मिळवण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी जातो. ही बाब लक्षात घेत आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी IRCTC लवकरच रेल्वे प्रवाशांना एक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
IRCTC सुरू करत असलेल्या या सेवेमुळे आता तुम्हाला तुमच्या तिकिटाचे रिफंड तब्बल १ तासात परत मिळणार आहेत. आयआरसीटीसी रिफंड सेवा फास्ट करण्यासाठी सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमसह एकत्रितपणे काम करत आहे. ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. या सेवेमुळे तुमचं तिकीट रद्द झाल्यास तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील. सर्व्हिस रेल्वे अथॉरिटी या प्रणालीत बदल करण्याचे काम करत आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमचे तिकीट वेटिंगमध्ये असेल आणि ते कन्फर्म झाले नसेल तर रिफंडचे पैसे तुम्हाला परत मिळतील, पण जर तुमचं कन्फर्म तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला काही प्रमाणात दंड आकारला जातो, मात्र तुम्ही ते कोणत्या वर्गाचं तिकीट बुकींग केलं आहे यावर अवलंबून असतं. कधी कधी तुमची ट्रेन सुटते आणि तुमचा दौरा रद्द होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला बुकिंगचे पैसे परत मिळवण्यासाठी टीडीआर दाखल करावा लागेल. एकदा TDR दाखल केल्यानंतर, रेल्वे विभाग त्याची त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात.
तुम्हाला IRCTC कडून रिफंड हवा असल्यास, तुम्हाला तिकीट रद्द करून ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधी TDR दाखल करावा लागेल. मात्र ३० मिनिटांच्या आता तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. आता ही नवीन सेवा लागू झाल्यानंतर देशभरातील रेल्वेच्या लाखो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.