Indian Railway: रेल्वे प्रवासात प्रवाशांना ५ सुविधा मिळतात मोफत, तुम्हाला माहिती आहेत का?

Indian Railways Offers 5 Free Services: भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासादरम्यान ५ सुविधा मोफत दिल्या जातात. अनेक रेल्वे प्रवाशांना याची माहिती नसल्यामुळे ते त्याचा लाभ घेत नाहीत. या सुविधा कोणत्या आहेत ते घ्या जाणून...
Indian Railway: रेल्वे प्रवासात प्रवाशांना ५ सुविधा मिळतात मोफत, तुम्हाला माहिती आहेत का?
Indian Railway Saam Tv
Published On

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. नेटवर्कच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगात चौथा क्रमांक आहे. भारतातील बहुतांश नागरिक हे ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. विमान, बसपेक्षा रेल्वेने प्रवास करण्यावर प्रवाशांचा भर असतो. रेल्वे प्रवासाच्या तिकिटाचे दर देखील सर्वांना परवडणारे आहे. भारतामध्ये दररोज लाखो नागरिक भारतीय रेल्वेने प्रवास करतात.

रेल्वे प्रवासाला प्रवाशांची वाढती पसंती लक्षात घेता भारतीय रेल्वे देखील त्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा देते. प्रवाशांचा प्रवास सुधारण्यासाठी या सुविधा पुरवल्या जातात. गेल्या काही वर्षात रेल्वे प्रवास जलद गतीने आणि जास्तीत जास्त आरामदायी आणि स्वस्तात व्हावा यासाठी भारतीय रेल्वे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. प्रवासादरम्यान रेल्वेच्या काही सुविधा प्रवाशांसाठी मोफत आहेत. पण रेल्वेच्या या सुविधांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण रेल्वेमध्ये मिळणाऱ्या ५ मोफत सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत...

Indian Railway: रेल्वे प्रवासात प्रवाशांना ५ सुविधा मिळतात मोफत, तुम्हाला माहिती आहेत का?
Indian Railway: भारतातील पहिली AC ट्रेन कोठून धावली?

बेडरोल सेवा -

भारतीय रेल्वेमध्ये एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत बेडरोल सेवा दिली जाते. एसी १, एसी २ आणि एसी ३ मधील प्रवाशांना ब्लँकेट, उशी, चादर आणि टॉवेल मोफत दिला जातो. गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा २५ रुपये फी देऊन उपलब्ध करून दिली जाते. काही ट्रेनमध्ये स्लीपर क्लासच्या प्रवाशांनाही ही बेडरोल सेवा मोफत दिली जाते.

वैद्यकीय सेवा -

भारतीय रेल्वेकडून प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. ट्रेनमध्ये अचानक आजारी पडल्यास प्रवाशांना वैद्यकीय सेवा मिळू शकते. यासाठी प्रवासी रेल्वे अधीक्षक, तिकीट कलेक्टर किंवा इतर कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याशी तुम्ही प्रवास करताना संपर्क साधू शकता.

Indian Railway: रेल्वे प्रवासात प्रवाशांना ५ सुविधा मिळतात मोफत, तुम्हाला माहिती आहेत का?
Indian Railways Berth Rule : रेल्वेमधील मिडल बर्थ कधी उघडता येतो? काय आहे नियम जाणून घ्या

जेवणाची सुविधा -

जर तुम्ही राजधानी, शताब्दी किंवा दुरांतो सारख्या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त उशिराने धावत असेल, तर रेल्वे प्रवाशांना मोफत जेवण देते.

लॉकर रूमची सुविधा -

भारतीय रेल्वेच्या काही स्थानकांवर प्रवाशांना क्लोक रूम आणि लॉकर रूमची सुविधा देखील मिळते. प्रवासी त्यात त्यांचे सामान ठेवू शकतात. या सुविधेसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावे लागेल.

Indian Railway: रेल्वे प्रवासात प्रवाशांना ५ सुविधा मिळतात मोफत, तुम्हाला माहिती आहेत का?
Indian Railway: रेल्वेचे SwaRail ऑल-इन-वन अ‍ॅप लॉन्च; Platform तिकीट ते जेवण, सर्व सुविधा मिळणार एकाच ठिकाणी

वेटिंग हॉल -

जर एखाद्या प्रवाशाला प्रवासादरम्यान ट्रेन बदलायची असेल किंवा काही काळ स्टेशनवर वाट पहावी लागली असेल तर तो रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या एसी किंवा नॉन-एसी वेटिंग हॉलचा वापर करू शकतात. ही सुविधा त्यांना अगदी मोफत मिळेल.

Indian Railway: रेल्वे प्रवासात प्रवाशांना ५ सुविधा मिळतात मोफत, तुम्हाला माहिती आहेत का?
Indian Railways: रेल्वे तिकिटाचं आरक्षण नाही? नो टेन्शन! विना रिझर्व्हेशन प्रवास करा, कधी आणि कोणत्या ट्रेन धावणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com