Railway Recruitment : भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! स्टेशन मास्टर पदासाठी १,२६५ जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज? वाचा

Indian Railway Master Recruitment 2026 Update News : भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी १,२६५ जागांची भरती जाहीर. अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती येथे जाणून घ्या.
Indian Railway Recruitment News
Indian Railway Recruitment News AI Image
Published On: 
Summary
  • भारतीय रेल्वेची मोठी घोषणा

  • स्टेशन मास्टर पदासाठी १,२६५ जागांची भरती जाहीर

  • जम्मू-श्रीनगरमध्ये १२२ आणि चेन्नईमध्ये ११९ पदासाठी जागा

तरुणांनो तुम्हीसुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी. भारतीय रेल्वेच्या RRB म्हणजेच रेल्वे भरती मंडळाने स्टेशन मास्टर पदासाठी १,२६५ जागांची भरती जाहीर केली आहे. यामुळे अनेक तरुणांना रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज कसा करता येणार, तसेच यासाठी पात्रता किती याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेल्वे भरती मंडळाने २०२६ पासून स्टेशन मास्टर पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पदासाठी पात्रता, परीक्षा प्रक्रिया आणि रिक्त जागांची माहिती जाहिरातीद्वारे दिली जाणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना भरतीसंदर्भातील आवश्यक माहिती एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे.

Indian Railway Recruitment News
Weather Update : ‘अर्णब’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकलं! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

या भरतीअंतर्गत देशातील विविध रेल्वे भरती मंडळांमध्ये एकूण १,२६५ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये मुंबई रेल्वे भरती मंडळासाठी सर्वाधिक १७७ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर जम्मू-श्रीनगर विभागात १२२, तर चेन्नई विभागात ११९ जागा आहेत. देशातील विविध भागांमध्ये या जागा उपलब्ध असल्यामुळे पात्र उमेदवारांना वेगवेगळ्या रेल्वे विभागांसाठी संधी मिळणार आहे.

Indian Railway Recruitment News
Morning Headache : सकळी उठल्या उठल्या डोकं दुखतं? असू शकतं 'या' भयंकर आजाराचं संकेत

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असतील. मात्र, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षणानुसार सवलती, परीक्षा पद्धती आणि इतर अटींबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व नियम काळजीपूर्वक वाचावेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२६ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com