Fitness Hike:भरघोस पगार हवाय ? तर फिटनेसकडे ठेवा लक्ष

Employees Health: नोकरीमध्ये मोठा पगार व्हावा यासाठी तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करत असतात.पण आता त्याची आवश्यकता नाही. गलेलठ्ठ पगारासाठी भारतातील कंपन्यांनी नवी उपक्रम सुरू केलाय.
Fitness Hike
Employees Healthcanva
Published On

भरघोस पगार हवा असेल तर, भारतातल्या कंपन्यांनांनी कर्मचाऱ्यांना फिट राहण्याचा सल्ला दिलाय. खासगी उद्योग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामावरून पैसे मिळतात. जेवढे चांगले आणि गुणवत्तेचे काम केले तर जास्त पगार मिळत असतो. मात्र आता कंपन्यांमध्ये नवा उपक्रम सुरू करण्यात आलाय. ज्या कर्मचाऱ्यांना मोठा पगार हवा असेल त्यांना त्यांच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांना फिटनेस ट्रेंडची संधी

सध्या भारतातल्या अनेक कंपन्यांमध्ये फिटनेसची जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्रेंडवर आता अनेक कंपन्यांनी लक्ष घातले आहे.या मागचा उद्देश हा सगळ्या कर्मचाऱ्यांनी निरोगी राहावे हा आहे.माणूस जितका फिट राहतो, तितका तो आनंदी असतो. त्यात व्यायाम करायची सवय शरीरासाठी उत्तम असते. याने कोणतेच आजार आपल्या शरीराला होत नाहीत. शिवाय कंपनीत जे लोक अचानक सुट्या घेतात त्यांच्या या समस्येवर हा एक तोडगा काढलाय.

Fitness Hike
Gold-Silver Rate : सोने-चांदी दरात विक्रमी वाढ, खरेदीदारांना सर्वात मोठा झटका; ३३ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं

कंपनीत होणार हे बदल

सोशल मीडियावर फिटनेसच्या ट्रेंडने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्स, ड्यूश बँके, फिलिप्स, मीशो यांसारख्या कंपन्यांमध्ये हा ट्रेंड फायदेशीर ठरणार आहे.तेथील कर्मचारी हे याच समस्येमुळे गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांच्या पगाराला कात्री लागते. यावर आता कंपन्या कामाबरोबर हेल्थ, फिटनेस या गोष्टी पाहून कामाच्या संधी देणार आहेत.

Fitness Hike
90km ची जबरदस्त रेंज, किंमत 79,999 रुपये; दैनंदिन वापरासाठी बेस्ट आहे 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

कर्मचाऱ्यांना आता मिळणार सुविधा

प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या फिटनेसचा विषय लक्षात घेता कंपन्या काही सुविधा देणार आहेत. त्या म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये डाएट फूड , तसेच पोषक तत्व मिळणारा आहार मिळणार आहेत.काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून 'वेलनेस सेशन' घ्यायला सुरूवात केली आहे.त्यामुळे कर्मचारी कामाचा ताण घेत असतील तर त्यांची शहानिशा केली जाते. तब्येतीची विचारपूस केली जाते.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com