देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक कार स्विफ्टचा CNG मॉडल लॉन्च केला आहे. याआधी स्विफ्ट फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध होती. पण आता सीएनजीमध्येही ग्राहकांना ही खरेदी करता येईल. चला जाणून घेऊया स्विफ्ट सीएनजीमध्ये काय खास आहे आणि किती आहे याची किंमत…
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजीमध्ये झेड-सिरीज ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आहे. पण पेट्रोलच्या तुलनेत यात काही बदल करण्यात आले आहेत. हे 1.2 लिटर इंजिन सीएनजी मोडमध्ये 69.75 पीएस पॉवर आणि 101.8 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हेच इंजिन याच्या पेट्रोल मॉडलमध्ये देण्यात आले आहे. ही कार सीएनजी प्रतिकिलो 33 किमी मायलेज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
नवीन स्विफ्ट सीएनजी VXi, VXi (O) आणि ZXi पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. याची किंमत 8.19 लाख रुपयांपासून सुरू होते. कारची लांबी 3860mm, उंची 1520mm आणि रुंदी 1735mm आहे.
CNG स्विफ्ट मध्ये देखील तुम्हाला पेट्रोल मॉडेलमध्ये दिलेले सर्व फीचर्स मिळतील. सुरक्षिततेसाठी, नवीन स्विफ्टचे सर्व प्रकार 6 एअरबॅग्ज, 3 पॉइंट सीट बेल्ट, हिल होल्ड कंट्रोल, ESC, EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारख्या फीचर्सने सुसज्ज आहेत.
स्विफ्ट सीएनजीमध्ये ऑल न्यू ब्लॅक इंटीरियर ग्राहकांना पाहायला मिळेल. यामध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 60:40 स्प्लिट सीट्स, रियर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि सुझुकी कनेक्ट यासारखे फीचर्स आहेत.
या नवीन कारमध्ये 5 जण आरामात बसू शकतात. पेट्रोल स्विफ्ट चार महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपनीने याचे सीएनजी मॉडल लॉन्च केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.