ICICI बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वरील निवडक व्याजदरात वाढ केली
काही ठराविक मुदतींच्या FD वर १० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली
ज्येष्ठ नागरिकांना पात्र FD वर कमाल ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार
दिवाळीपूर्वी ICICI बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेने FD च्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. काही ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात ०.१० टक्क्यांनी म्हणजेच १० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना एफडीवर जास्तीत जास्त ६.६० टक्के व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.२० टक्क्यांपर्यंत आहे असे बँकेने म्हटले आहे.
ICICI बँकेने २ वर्ष १ दिवस ते ३ वर्षांच्या एफडीवर व्याजदर ६.४५ टक्क्यांवरून ६.५५ टक्के केला आहे. तर ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षांच्या मुदतीसाठी व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६०.६० टक्के करण्यात आला आहे. याशिवाय ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षांच्या FD वरही आता ६.६० टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी हा दर ६.५० टक्के इतका होता. ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हर एफडीच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सामान्य ग्राहकांना ६.६० टक्के तर, ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के व्याज मिळणार आहे.
तसेच ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर २.७५ टक्के, ४६ ते ९० दिवसांसाठी ४ टक्के आणि ९१ ते १८४ दिवसांसाठी ४.५० टक्के व्याज मिळेल. १८५ दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी एफडीवर ५.५० टक्के व्याज दिले जाईल. १ वर्ष ते १८ महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी ६. २५ टक्के, तर १८ महिने ते २ वर्षांसाठी ६.३० टक्के व्याज मिळेल
ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य ग्राहकांपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरू शकते. मात्र, एफडी करण्यापूर्वी बँकेचे अधिकृत व्याजदर, अटी आणि मुदत नक्की तपासून घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.