
आयएएस तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रातील निर्भीड अधिकाऱ्यांपैकी एक आहे. तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या शिस्तीमुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांना ओळखले जाते. तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली झाली. त्यांची नियुक्ती दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सचिव म्हणून करण्यात आली. याआधी ते विकास आयुक्त (असंघटित कामगार) या पदावर कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी २४वी बदली झाली आहे.
तुकाराम मुंढे यांचा संघर्षमय प्रवास (IAS Tukaram Mudhe Inspirational Story)
तुकाराम मुंढे हे मूळचे बीडचे ताडसोन्ना गावचे रहिवासी. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी झाला. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. बिकट परिस्थिती असतानाही त्यांनी मोठ्या जिद्दीने आयएएस अधिकारी व्हायचे ठरवले आणि त्यांनी हे स्वप्न सत्यातदेखील उतरवले.
दोन वेळच्या जेवणासाठी परवड
तुकाराम मुंढे यांचा प्रवास सोपा नव्हता. तुकाराम मुंढे यांचं बालपण गावातच गेले. ते सकाळपासून संध्याकाळापर्यंत मेहनत करायचे. त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायचे. यानंतरच त्यांना दोन वेळेचं जेवण मिळायचं. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांचे वडील हरिभाऊ मुंढे हे सावकाराच्या कर्जात बुडालेले होते. त्यांनी ही परिस्थिती बदलायचा निर्णय घेतला.
तीन वेळा अपयश
तुकाराम मुंढे यांनी गावीच दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.यानंतर त्यांनी कुटुंबाला मदत व्हावी म्हणून शेतीत काम करायला सुरुवात केली.तुकाराम मुंढे यांनादेखील अनेकदा अपयश आले. पहिल्या प्रयत्नात त्यांना मेन्स परीक्षेत अपयश मिळाले. दुसऱ्या प्रयत्नानतही पदरात अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नात प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली परंतु मुलाखतीत त्यांना यश मिळाले नाही.यानंतर त्यांनी २००३ साली एमपीएससी परीक्षा क्लिअर केली. क्लास २ मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं.
यानंतर त्यांनी २०४ मध्ये पुन्हा यूपीएससी (UPSC) देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. एवढेच नव्हे तर भारतात २०वी रँक प्राप्त केली.त्यानंतर आज ते आयएएस अधिकारी म्हणून रुजू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.